किमान तापमान : 28.76° से.
कमाल तापमान : 29.58° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 65 %
वायू वेग : 5.62 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.58° से.
27.43°से. - 30.66°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.65°से. - 29.75°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल28.17°से. - 30.49°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर घनघोर बादल27.6°से. - 30.66°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश27.16°से. - 30.26°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.33°से. - 29.95°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश– प्रादेशिक संपर्क व्यवस्था योजना,
नवी दिल्ली, (२७ ऑक्टोबर) – प्रादेशिक संपर्क व्यवस्था योजना (आरसीएस) – उडानने (उडे देश का आम नागरिक) सहा वर्ष पूर्ण केली आहेत. भारतातील पायाभूत सुविधा आणि संपर्क व्यवस्था सुधारणे, विशेषत: दुर्गम आणि सेवा नसलेल्या प्रदेशांमध्ये ती सुधारणे हा या सरकार-समर्थित उपक्रमाचा उद्देश आहे. नागरी विमान वाहतुक मंत्रालयाने २१ ऑक्टोबर २०१६ रोजी १० वर्षांची ध्येयदृष्टी ठेवत याची सुरूवात केली होती. राष्ट्रीय नागरी विमान वाहतुक धोरण २०१६ चा हा एक महत्त्वाचा घटक आहे.
शिमला ते दिल्ली दरम्यान पहिल्या आरसीएस-उडान उड्डाणाचा प्रारंभ २७ एप्रिल २०१७ रोजी पंतप्रधानांच्या हस्ते झाला होता. देशातील हवाई सेवा नसलेल्या प्रदेशांमध्ये, वापरात नसलेले हवाई मार्ग सुधारण्यावर आणि सामान्य नागरिकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यावर ही योजना लक्ष केंद्रित करते.
आतापर्यंत, आरसीएस-उडान योजनेच्या माध्यमातून १३० लाखाहून अधिक प्रवाशांनी विमान प्रवास केला आहे. यामुळे विमान प्रवासाची सुलभता वाढवण्यात यश आले आहे.
६ वर्षांच्या कालावधीत, उडान योजनेच्या विविध आवृत्त्यांचा प्रारंभ करण्यात आला आणि त्या कार्यान्वित करण्यात आल्या.
सर्व आकाराच्या नवीन विमानांची मागणी
योजना विस्तारामुळे नवीन विमानांची मागणी वाढली आहे. विमानांची वाढलेली मागणी भारतीय विमानांच्या मागणीद्वारे सिद्ध झाली आहे. पुढील १०-१५ वर्षांमध्ये १,००० विमानांचा पुरवठा केला जाणार आहे. भारताच्या विद्यमान ताफ्यात होणार्या लक्षणीय वाढीचेच हे निदर्शक आहे. सध्या विविध विमान कंपन्यांद्वारे चालवल्या जाणार्या अंदाजे ७०० विमानांचा यात समावेश आहे.
धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेली खजुराहो, देवघर, अमृतसर आणि किशनगढ (अजमेर) सारखी ठिकाणे या उपक्रमाने यशस्वीरित्या जोडली आहेत. पासीघाट, झिरो, होलोंगी आणि तेझू विमानतळांमुळे संपूर्ण ईशान्य प्रदेशातील पर्यटन उद्योगाची लक्षणीय वाढ झाली आहे.
उडानने यशस्वीरित्या ६ वर्षे पूर्ण करणे हा विमान वाहतूक क्षेत्रासाठी एक मैलाचा टप्पा आहे असे नागरी विमान वाहतूक आणि पोलाद मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया म्हणाले. ही उल्लेखनीय कामगिरी विमान वाहतूक क्षेत्राचे लोकशाहीकरण आणि सर्वांसाठी सुलभ हवाई प्रवास सुनिश्चित करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा दाखला आहे असेही त्यांनी सांगितले.