किमान तापमान : 28.5° से.
कमाल तापमान : 29.49° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 60 %
वायू वेग : 2.86 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.49° से.
27.34°से. - 30.71°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.15°से. - 29.76°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.65°से. - 30.93°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर घनघोर बादल27.1°से. - 31.17°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.59°से. - 30.7°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.71°से. - 30.37°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशनवी दिल्ली, (२७ ऑक्टोबर) – मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने घोषित केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत केंद्रीय नागरी उड्डयण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचे नाव असल्यामुळे भाजपातील त्यांचे वाढते महत्त्व अधोरेखित होते. मध्यप्रदेशातील भाजपाचे विद्यमान सरकार हे ज्योतिरादित्य शिंदे यांचीच मोठी उपलब्धी आहे. २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसला निसटते बहुमत मिळाले होते आणि कमलनाथ मुख्यमंत्री झाले होते. मात्र, शिंदे यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या २५ आमदारांनी बंड केल्यामुळे कमलनाथ यांच्या नेतृत्वातील सरकार कोसळून राज्यात शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वात भाजपाचे सरकार आले होते. शिंदे समर्थक १० आमदारांचा शिवराजसिंह यांच्या मंत्रिमंडळात समावेशही झाला.
राज्यातील सत्ताबदल यशस्वीपणे केल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे यांनी राज्याच्या राजकारणात राहण्याऐवजी केंदाच्या राजकारणात जाण्याचा निर्णय घेतला. भाजपाने त्यांना राज्यसभेवर घेतले आणि मोदी सरकारमध्ये त्यांचा समावेशही झाला. केंद्रात आल्यानंतरही शिंदे यांचे मध्यप्रदेशच्या राजकारणावर लक्ष होते. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून अधूनमधूनन शिंदे यांच्या नावाची चर्चाही होत होती. भाजपाने नरेंद्रसिंह तोमर, प्रल्हादसिंह पटेल आणि फग्गनसिंह कुलस्ते या तीन केंद्रीय मंत्र्यांना मध्यप्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत उतरवल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे यांनाही भाजपा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, विधानसभा निवडणूक लढवण्याची आपली तयारी नसल्याचे शिंदे यांनी जाहीर केले. नंतर त्यांनी आपल्या विधानाचा इन्कार केला. विधानसभा निवडणूक मला लढवायची नाही, असे मी म्हटले नाही, पक्षाने आदेश दिला तर मी निवडणूक लढवू शकतो, असा खुलासा त्यांनी केला. भाजपाने विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या उमेदवाराच्या यादीत नाव नसल्यामुळे भाजपा त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उरवण्यास तयार नसल्याचे अखेर स्पष्ट झाले.