किमान तापमान : 28.93° से.
कमाल तापमान : 28.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 61 %
वायू वेग : 3.05 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.99° से.
27.43°से. - 30.66°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.65°से. - 29.75°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल28.17°से. - 30.49°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर घनघोर बादल27.6°से. - 30.66°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश27.16°से. - 30.26°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.33°से. - 29.95°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश-वरिष्ठ स्तरावरील नियुक्त्यांची घोषणा,
मुंबई, (२७ ऑक्टोबर) – एअर इंडियाने कॅप्टन क्लॉस गोअर्स यांची कार्यकारी उपाध्यक्ष आणि मुख्य परिचालन अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. यासह इतर वरिष्ठ स्तरावरील नियुक्त्यांची घोषणा करण्यात आली. कॅप्टन क्लॉस गोअर्स हे परवानाधारक पायलट आहे. त्यांनी ब्रिटिश एअरवेज आणि एअर कॅनडात समान पदांवर काम केले आहे. ते एअर इंडियाच्या नवीन गुरुग्राम मुख्यालयातून काम करतील. एअर इंडियाने सांगितले की, सध्याचे परिचालन प्रमुख आर. एस. संधू सल्लागाराच्या भूमिकेत राहतील.
एका प्रकाशनात एअर इंडियाने सांगितले की, गोअर्स यांच्याकडे टाटा एअर लाईन्सच्या चार कार्यपद्धती, एअरबस ए ३५० एंट्री-टू-सर्व्हिस प्रोग्राम आणि वाहकांच्या नवीन प्रशिक्षण अकादमीची स्थापना करण्याच्या चमूला मदत करण्याचे काम राहणार आहे. कॅ. गोअर्स यांचे स्वागत करताना एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक कॅम्पबेल विल्सन म्हणाले, जगातील काही उत्कृष्ट एअर लाईन्समध्ये काम केल्यामुळे, त्यांच्याकडे ज्ञान आणि अनुभवाचा मौल्यवान खजिना आहे, जो एअर इंडियामध्ये चालू असलेल्या परिवर्तनासाठी महत्त्वपूर्ण आणि मौल्यवान ठरेल.
एअर लाईनने आपल्या व्यवस्थापन संघाला अधिक बळकट करण्यासाठी इतर वरिष्ठ नियुक्त्यांची घोषणा केली. कॅप्टन मनीष उप्पल यांची फ्लाईट परिचालनाचे वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून नियुकती करण्यात आली आहे, तर कॅप्टन हेनी डोनोहो हे कॉर्पोरेट सेफ्टी आणि क्वालिटीचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहतील. पंकज हांडा ग्राऊंड परिचालनाचे नेतृत्व करतील.