किमान तापमान : 28.43° से.
कमाल तापमान : 28.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 61 %
वायू वेग : 2.87 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.99° से.
27.65°से. - 29.75°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर घनघोर बादल28.17°से. - 30.49°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.6°से. - 30.66°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश27.16°से. - 30.26°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.33°से. - 29.95°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.04°से. - 29.71°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश– राज्यातर्फे दहा लाखांची मदत,
– राहुल गांधींच्या आरोपावर लष्कराची स्पष्टोक्ती,
नवी दिल्ली, (२७ ऑक्टोबर) – सियाचीन येथे कर्तव्य बजावताना हुतात्मा झालेले बुलढाण्यातील अग्निवीर अक्षय लक्ष्मण गवते यांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांपेक्षा जास्तीची मदत केली जाणार असल्याचे लष्कराने सोमवारी स्पष्ट केले. जवानाच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई संबंधित अटी आणि सेवा शर्तींद्वारे दिली जाते, असे राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांच्या पृष्ठभूमीवर लष्कराने सांगितले. अक्षय यांच्या शोकाकूल कुटुंबाला पाठिंबा देताना अतिरिक्त महासंचालनालय, सार्वजनिक माहिती महासंचालनालय, एमओडीया मुख्यलयाने समाज माध्यमावरील पोस्टमध्ये म्हटले की, आर्थिक मदतीबाबत समाज माध्यमांवरील विरोधाभासी संदेश लक्षात घेता, अजय यांच्या कुटुंबीयांना दिली जाणारी मदत स्पष्ट करणे महत्त्वाचे आहे.
यात ४८ लाखांची नॉन कॉन्ट्रिब्युटरी विमा रक्कम, ४४ लाख रुपयांचे एक्स-ग‘ॅशिया पेमेंट, अग्निवीर सेवा निधी योगदान (३० टक्के) आणि जमा झालेल्या व्याजासह सरकारकडून जुळणार्या योगदानाचा समावेश आहे. त्यात जवानाच्या मृत्यूच्या तारखेपासून ते चार वर्षे पूर्ण होईपर्यंत उर्वरित काळासाठी मिळणार्या वेतनाचाही समावेश आहे. सध्याच्या प्रकरणात ही रक्कम १३ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, असे लष्कराने म्हटले आहे. या व्यतिरिक्त आर्म्ड फोर्सेस बॅटल कॅज्युअल्टी फंडातून आठ लाख रुपयांचे अतिरिक्त योगदान नातेवाईकांना दिले जाईल. तत्काळ मदत देण्यासाठी आर्मी वाईव्हज वेल्फेअर असोसिएशन ३० हजारांची आर्थिक मदत देत आहे, असे लष्कराने सांगितले.
अग्निवीरांसाठी असलेल्या नियमांप्रमाणे, युद्धात मृत्यू झालेल्या व्यक्तीसाठी अधिकृत मानधनाचा समावेश असेल, नॉन कॉन्ट्रिब्युटरी विमा रक्कम, ४८ लाख, अग्निवीरने (३० टक्के) योगदान दिलेला सेवा निधी, सरकारच्या समान योगदानासह आणि त्यावरील व्याज दिले जाते. ४४ लाख रुपयांचा एक्स ग्रेशिया. मृत्यूच्या तारखेपासून चार वर्षे पूर्ण होईपर्यंत शिल्लक कालावधीचे वेतन (त्वरित प्रकरणांत १३ लाखांपेक्षा जास्त) दिले जाते. आर्म्ड फोर्सेस बॅटल कॅज्युअल्टी फंडातून आठ लाखांचे योगदान. आर्मी वाइव्हज वेल्फेअर असोसिएशनकडून ३० हजारांची तत्काळ मदत दिल्याचे, या पोस्टमध्ये लष्कराने म्हटले आहे.
अक्षय गवतेंच्या कुटुंबीयांना राज्यातर्फे दहा लाखांची मदत
मुंबई – सियाचीनमध्ये कर्तव्य बजावताना महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील अग्निवीर अक्षय गवते याचा मृत्यू झाला. अक्षयच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त करतानाच त्याच्या कुटुंबीयांना राज्य शासनातर्फे दहा लाख रुपयांची मदत जाहीर केल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. जवान अक्षय गवते हा बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव सराई येथील होते. वीरमरण आलेला हा महाराष्ट्रातील पहिला अग्निवीर असल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अक्षयच्या निधनाबद्दल त्याच्या कुटुंबीयांप्रती मुख्यमंत्र्यांनी सहवेदना व्यक्त केली.