किमान तापमान : 26.99° से.
कमाल तापमान : 28.18° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 61 %
वायू वेग : 3.84 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.99° से.
26.99°से. - 30.14°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल28.06°से. - 30.88°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.63°से. - 31.01°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश27.09°से. - 29.92°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.35°से. - 30.07°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.17°से. - 29.52°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश– दोन्ही याचिकाकर्ते प्रौढ आहेत : दिल्ली उच्च न्यायालय,
नवी दिल्ली, (२७ ऑक्टोबर) – आपल्या आवडीच्या व्यक्तीशी विवाह करणे, हा घटनात्मक अधिकार आहे, असे सांगत प्रेमविवाह केलेल्या दिल्लीतील एका दाम्पत्याला पोलिस संरक्षण देण्याचा आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिला. या दाम्पत्याला कुटुंबीयांकडून धमक्या मिळत होत्या, त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आपण निवडलेल्या व्यक्तीशी लग्न करता येणे हा घटनेने संरक्षित केलेला आणि नष्ट न करता येणारा अधिकार आहे. अशा लग्नावर कुटुंबीयदेखील आक्षेप घेऊ शकत नाहीत, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
न्या. तुषार राव गेडेला यांनी हा निकाल देताना म्हटले, नागरिकांचे संरक्षण करणे ही राज्याची घटनात्मक जबाबदारी आहे. न्यायालये घटनात्मक व्यवस्था असल्याने घटनात्मक हक्कांना बळकटी देणे, हे आमचे काम आहे. याचिकाकर्त्यांचा स्वतःच्या निवडीनुसार विवाह करण्याचा अधिकार घटनेत संरक्षित आहे, हा अधिकार कोणत्याही स्थितीत सौम्य करता येणार नाही. दोन्ही याचिकाकर्ते प्रौढ आहेत आणि त्यांनी स्वतःच्या इच्छेने लग्न केले आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे कोणतीही व्यक्ती अगदी कुटुंबातील लोकही या लग्नावर आक्षेप घेऊ शकत नाहीत. या याचिकेतील जोडप्याने एप्रिलमध्ये लग्न केले आहे. या लग्नाला त्यांच्या कुटुंबीयांचा विरोध आहे. ते सध्या एकत्र राहात आहेत, पण मुलीच्या आईकडून त्यांना वारंवार धमक्या दिल्या जात आहेत.