किमान तापमान : 27.32° से.
कमाल तापमान : 27.98° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 62 %
वायू वेग : 3.39 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.32° से.
26.99°से. - 29.5°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.9°से. - 30.84°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.76°से. - 30.97°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश27°से. - 30.63°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.46°से. - 30.16°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर कुछ बादल26.12°से. - 29.61°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाशनवी दिल्ली, (२७ ऑक्टोबर) – पॅराबोलिक ड्रग्ज प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय अर्थात् ईडीने कारवाई करीत, पाच शहरांमध्ये १७ ठिकाणी छापे टाकले. अवैध सावकारी प्रतिबंधक कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. दिल्लीत ७ आणि मुंबईत ३ ठिकाणी तसेच पंजाबमधील पंचकुला, अंबाला आणि चंदीगडमध्ये सात ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. या प्रकरणात कंपनीचे संचालक प्रणव गुप्ता आणि विनीत गुप्ता यांच्यावर १६ हजार कोटी रुपयांची बँक फसवणूक केल्याचा आरोप आहे. दोघेही प्रसिद्ध अशोका विद्यापीठाच्या संस्थापक समितीचे सदस्य आहेत.
या विद्यापीठाशी संबंधित काही दस्तावेजही ईडीकडून तपासले जात आहेत. प्रणव आणि विनीत गुप्ता यांनी सीबीआयच्या कारवाईनंतर मागील वर्षी या शिक्षण संस्थेतील सर्व पदांचा राजीनामा दिला होता. विशेष म्हणजे, पॅराबोलीक ड्रग्ज प्रकरणाचा तपास करण्यासाठी ईडीने आणखीही काही दस्तावेज मागितले आहेत. दरम्यान, अशोका विद्यापीठाचा आमच्याशी काहीच संबंध नसल्याचा दावा पॅराबोलीक ड्रग्जतर्फे सातत्याने करण्यात आला आहे.