किमान तापमान : 28.54° से.
कमाल तापमान : 29.63° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 60 %
वायू वेग : 2.05 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.54° से.
27.45°से. - 29.9°से.
रविवार, 17 नोव्हेंबर हल्की वर्षा27.47°से. - 31.24°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.29°से. - 31.41°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.45°से. - 30.88°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.91°से. - 30.52°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.48°से. - 30.03°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाश– पुढील सहा महिने डाळींचे भाव स्थिर राहतील,
नवी दिल्ली, (२७ ऑक्टोबर) – डाळींची ताजी आवक आणि चांगला सरकारी साठा यामुळे डाळींचे भाव खाली येऊ लागतील आणि पुढील सहा महिने स्थिर राहतील, अशी सरकारला आशा आहे. एका वरिष्ठ सरकारी अधिकार्याने ही माहिती दिली आहे. डाळींची भाववाढ वर्षभर सातत्याने उंचावली. सप्टेंबरमध्ये डाळींच्या घाऊक महागाईने १७.७ टक्क्यांच्या ४८ महिन्यांतील उच्चांक गाठला. मसूर वगळता जवळपास सर्व प्रकारच्या डाळींचे भाव वाढले आहेत. अरहर/ तूर डाळीच्या किमतीत सर्वाधिक वाढ झाली आहे, ज्यांची किरकोळ महागाई सप्टेंबरमध्ये ३७ टक्क्यांच्या सहा वर्षांच्या उच्चांकावर होती. सध्या देशात तूर डाळीची सरासरी किरकोळ किंमत १५२ रुपये प्रति किलो आहे. तर उडदाचा भाव ११९.७० रुपये प्रति किलो आहे.
कडधान्याखालील क्षेत्रात वर्षभराच्या आधारे सुमारे ६ टक्क्यांनी घट झाली असली, तरी नोव्हेंबरपासून नवीन आवक झाल्यामुळे डाळींच्या किमती कमी होतील, अशी सरकारला आशा आहे. अधिकार्याच्या म्हणण्यानुसार, ’नवीन पिके बाजारात आल्याने पुढील सहा महिने भाव स्थिर राहतील अशी आमची अपेक्षा आहे. तसेच, ज्या आंतरराष्ट्रीय भौगोलिक प्रदेशातून आपण आयात करतो तेथे चांगली कापणी अपेक्षित आहे. याशिवाय, सरकारकडे सध्या सुमारे ४० लाख मेट्रिक टन डाळी आहेत, ज्या आवश्यकतेनुसार सोडल्या जातील. गेल्या हंगामात जादा खरेदी झाल्यामुळे यावर्षी आमचा बफर स्टॉक खूप जास्त आहे. हे आम्हाला वेळ आल्यावर किमती स्थिर ठेवण्यास मदत करेल.
सरकारने चार महिन्यांत घाऊक बाजारात सुमारे १.६ लाख मेट्रिक टन तूर डाळ आधीच सोडली आहे. याशिवाय, किमती स्थिर ठेवण्यासाठी सरकारने आंतरराष्ट्रीय क्षेत्रातून आयात केलेल्या वाणांची खरेदी सुरू केली आहे. अधिकार्याने सांगितले की, म्यानमार तसेच पूर्व आफ्रिकन देशांनी या हंगामात चांगले उत्पादन घेतले आहे. तूर आणि उडीद या दोन्हींच्या आयातीला कोणतीही अडचण येऊ नये. सरकारने साठेबाजी रोखण्यासाठी पावले उचलली आहेत आणि या कॅलेंडर वर्षाच्या अखेरीपर्यंत स्टॉक-होल्डिंग मर्यादा लादून, बाजारात तूर आणि उडीदचे पुरेशा प्रमाणात वितरण सुनिश्चित केले आहे. जानेवारी २०२३ च्या सरकारी अधिसूचनेनुसार, सध्या तूर आणि उडीद कोणत्याही आयात शुल्कापासून मुक्त आहेत. देशातील एकूण खरीप कडधान्य उत्पादनापैकी तूर आणि उडीदचा वाटा दोन तृतीयांश आहे. भारताच्या डाळींच्या आयातीत या दोन डाळींचा वाटा ७० टक्क्यांहून अधिक आहे. भारत आपली बहुतांश तूर डाळ म्यानमार आणि मलावी, मोझांबिक आणि टांझानिया यांसारख्या पूर्व आफ्रिकन देशांमधून आयात करतो, तर उडीद बहुतेक म्यानमार आणि संयुक्त अरब अमिरातीमधून खरेदी केली जाते. देशाने या कॅलेंडर वर्षात आधीच सुमारे २४ लाख टन डाळींची आयात केली आहे, ज्यामध्ये ८ लाख टन तूर, ६ लाख टन उडीद आणि १० लाख टन मसूर यांचा समावेश आहे.