किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल– एंडोस्कोपी फ्लेक्सी कॅमेराद्वारे साधला संपर्क,
– सुरक्षित बाहेर काढण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात,
उत्तरकाशी, (२१ नोव्हेंबर) – मागील १० दिवसांपासून उत्तरकाशीतील बोगद्याचा काही भाग खचल्यामुळे तिथे अडकलेल्या ४१ कामगारांबाबत मंगळवारी अतिशय समाधानकारक बातमी समोर आली आहे. या कामगारांशी प्रथमच एंडोस्कोपी फ्लेक्सी कॅमेराद्वारे संपर्क करण्यात आला आहे. त्यांच्याशी संभाषण करून चौकशी करण्यात आली.
सर्व मजूर सुरक्षित असून, त्यांना सुरक्षित बाहेर काढण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती मदत व बचाव कार्यात सहभागी असलेल्या अधिकार्यांनी दिली. अधिकार्यांनी आज बोगद्यात अडकलेल्या कामगारांशी संपर्क साधल्यानंतरचा व्हिडीओ जारी केला. संपर्क साधण्यासाठी पर्यायी सहा इंचीच्या पाईपलाईनमधून एंडोस्कोपी फ्लेक्सी कॅमेरा सोडण्यात आला. सोमवारी ही पाईपलाईन टाकण्यात आली होती. याच पाईपच्या माध्यमातून कामगारांना आता जेवण आणि इतर अत्यावश्यक सामग्री पुरविण्यात येत आहे. नवी दिल्लीहून सोमवारी सायंकाळी हा कॅमेरा मागविण्यात आला होता.
या व्हिडीओमध्ये सर्व कामगार पिवळा आणि पांढरा हेल्मेट घातलेले दिसत आहेत. पाईपलाईनच्या माध्यमातून सोडण्यात आलेले खाद्यपदार्थ ते स्वीकारत आहेत आणि एकमेकांशी गप्पा मारताना दिसत आहेत. या सर्व कामगारांना एकेक करून कॅमेरासमोर बोलावण्यात आले आणि त्यांची प्रकृतीची माहिती घेण्यात आली. या व्हिडीओमुळे अडकलेल्या कामगारांच्या कुटुंबीयांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. या कामगारांच्या कुटुंबातील सदस्य मागील चार ते पाच दिवसांपासून घटनास्थळी बसले आहेत. बोगद्यात अडकलेल्या कामगारांची स्थिती नेमकी कशी आहे, याची माहिती घेण्यासाठी ही पाईपलाईन टाकण्यात आली असून, एंडोस्कोपी फ्लेक्सी कॅमेरा त्यासाठी विशेष करून मागविण्यात आला आहे, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत विकास महामंडळ लि.चे संचालक अंशू मनीष यांनी दिली.