किमान तापमान : 24.74° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल– श्री वासुदेव आश्रमात सरसंघचालक मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन,
वाशीम, (२१ नोव्हेंबर) – आपला भारत देश म्हणजे हिंदू राष्ट्र आहे. जगाला धर्म देण्याचे काम भारताला करायचे आहे. सगळ्या जगातल्या लोकांना कसे जगावे हे त्यांना शिकविण्याची आपली जबाबदारी आहे. जगाला धर्म देण्यासाठी भारताला जगायचे आहे. आपापल्या संप्रदायाचे काम प्रत्येकाने सातत्याने केले पाहिजे, त्यासाठी समाजाचा व्यूह तयार व्हायला पाहिजे, लोकहितातून देशहित साधायचे आहे, अशाने भारत हा पुन्हा एकदा विश्वगुरूपदी आरूढ झालेला लवकरच आपणास पाहायला मिळेल असे प्रतिपादन सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी येथील श्री वासुदेव आश्रमात मंगळवार २१ नोव्हेंबर रोजी केले.
येथे प.पू.पंडितकाका धनागरे महाराजांनी स्थापन केलेल्या श्री वासुदेव आश्रमात फार वचित केला जाणारा चातुर्मास्य श्रौत याग श्रीकूष्मांड नवमी महोत्सवाच्या अनुषंगाने होत आहे. त्या निमित्त प.पू.मोहनजी भागवत यांचे येथे उद्बोधन पार पडले. १८५७ पासून भारताच्या उत्थानास प्रारंभ झाला आहे. ती प्रक्रिया सुरू झाली आहे. नियती भारताला विश्वगुरू पदी आरूढ करविणारच आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले. आमच्या पूर्वजांनी धर्माला अनुसरून कर्म दिले आहेत. संघात शाखा सर्व काही आहे पण कुठेही अतिवादिता नको. मनुष्याला आपल्या सेवेची योग्यता टिकवावी लागते. आणि सोबतच सेवेला श तीची जोडही हवीच आहे असेही मोहनजी या प्रसंगी म्हणाले. येथे मी आशीर्वाद घ्यायला आलो आहे असे सांगून सरसंघचालक पुढे म्हणाले की, कुठल्याही कामाला भगवंताचे अधिष्ठान लागते. त्यासाठी सत्याचे अधिष्ठान आवश्यक आहे. आपली ही कृती अमरत्वाकडे , प्रकाशाकडे जाणारी असावी तर ती यश देते. अधर्माने वागले तर सृष्टी कोपते. प्रत्येक स्वभावाचे एक प्रयोजन आहे. सृष्टीतील धुळीचा एक कणही अप्रयोजित नाही असे सांगून ते पुढे म्हणाले की, प्रत्येकाला सृष्टीने संतुलनाचे काम दिले आहे. हे संतुुलित जीवन राखणे म्हणजेच धर्म होय. एकेकाळी विश्वगुरू असलेल्या भारताची स्थिती खराब का झाली याची कारण मिमांसा सांगताना सरसंघचालक मोहनजी भागवत म्हणाले की, आपल्या जीवनातील कर्म लोप झाला की,समाज ढासळतो, सुबत्ता, सुरक्षा आल्यावर आळस आणि गाफिलपणा आपल्यात आला, त्यामुळे धर्माप्रती अंधश्रद्धा निर्माण झाली व उपेक्षा आली त्यातून विकृती निर्माण झाली परिणामी आपल्या एवढ्या शतीशाली राष्ट्रावर परकीय आक्रमणे झालीत असे ते म्हणाले.
ज्ञान हे योग्य माणसाच्या हाती लागले नाही तर अनर्थ होतो. आपण इंद्राच्या देव संस्कृतीचे वारसदार आहोत. जीवन जगताना भौतिक ज्ञानही आवश्यक आहे पण मृत्यूवर विजय मिळविण्यासाठी विद्या, ज्ञान आवश्यक आहे. आमच्या पूर्वजांनी या ज्ञानाचा शोध घेवून एक अत्यंत चिरकालिक अशी धर्म आणि समाज रचना तयार केली, आमच्या ऋषी, मुनींनी हे सर्व ज्ञान सर्व समाजात पोहोचविले. आता पुनश्च तसेच प्रचंड कर्तव्या आम्हा सर्वार्ंना करावे लागणार आहे. भौतिक ज्ञानाची मर्यादा दिसून आली आहे. मन हे प्रकाशापेक्षा जास्त वेगाने कुठेही जाते त्यामुळे पूर्वीच्या ऋषी मुनीं प्रमाणे मनाचा अभ्यास करावा लागणार आहे आता यापुढे आध्यात्मच चालणार आहे असेही ते म्हणाले.
नाना महाराज, पंडितकाकांनी सांगितली कर्मनिष्ठा
जगाला मार्ग दाखविणारा भारत आपण उभा केला पाहिजे. प.पू.नाना महाराज तराणेकर, प.पू.पंडितकाका धनागरे महाराज आणि आता प.पू.विजयकाका पोफळी महाराज हे सातत्याने कर्म निष्ठेने केले पाहिजे असे आचरणातून सांगत आहेत. त्यातूनच माणसाची आत्मोन्नती होते. आपणास आपल्या महान सत्पुरूषांकडून मिळालेले सुकृत वाया घालवू नका, जे त्यांच्याकडून मिळाले ते सतत करीत राहा म्हणजे प्रगती होत राहाते. जगात कोणीही संकटात आले की त्यांना नि:स्वार्थ मदत करणारा भारत हा जगाच्या पाठीवर एकमेव देश आहे. या काळात जगात भारतच हा देश एकमेव विश्वासपात्र असा आहे असे मोहनजी भागवत म्हणाले.
ज्यांना कसलाच मोह नाही ते मोहनजी
ज्यांना कसलाच मोह राहिला नाही ते म्हणजे मोहनजी भागवत आहेत असे उद्गार या प्रसंगी बंगळुरू येथील श्रुंगेरी महासंस्थानचे मठाधिपती विद्या विश्वेश्वर भारती शंकराचार्य महास्वामी महाराजांनी काढले. सूर्य मावळताना आपले तेज शमी वृक्षात ठेवतो त्याच प्रमाणे प.पू.पंडितकाका धनागरे महाराजांनी त्यांचे तेज प.पू.विजयकाका पोफळी महाराज यांच्यात प्रतिष्ठापित केले आहे असेही महास्वामी म्हणाले. करवीर संकेश्वर पीठाचे जगद्गुरू शंकराचार्य सच्चितानंद अभिनव विद्या नृसिंह भारती महास्वामी महाराज यांनी ५० चातुर्मास्य याग केले आहेत अशी माहिती सुद्धा श्रुंगेरीच्या शंकराचार्यांनी या वेळी दिली.
या प्रसंगी व्यासपीठावर श्रुंगेरी महासंस्थानचे मठाधिपती विद्या विश्वेश्वर भारती शंकराचार्य महास्वामी, करवीर संकेश्वर पीठाचे जगद्गुरू शंकराचार्य सच्चितानंद अभिनव विद्या नृसिंह भारती महास्वामी महाराज तसेच सरसंघचालक मा.मोहनजी भागवत आणि श्रीवासुदेव आश्रमाचे प.पू.विजयकाका पोफळी महाराज उपस्थित होते.