किमान तापमान : 25.97° से.
कमाल तापमान : 27.32° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 41 %
वायू वेग : 9.47 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.32° से.
23.58°से. - 27.99°से.
शुक्रवार, 24 जानेवारी घनघोर बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.47°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादल– ड्रॅगनच्या कुरापती सुरूच,
नवी दिल्ली, (२६ मे) – लडाख आणि अरुणाचल प्रदेशनंतर चीनच्या कुरापती उत्तराखंडला लागून असलेल्या सीमेवरही सुरू झाल्या आहेत. उत्तरखंडच्या सीमेजवळ चीनने एक संपूर्ण गावच उभारले असल्याची माहिती आहे. हे गाव प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून केवळ ११ किमी अंतरावर आहे. एका इंग्रजी दैनिकाने याबाबतचे वृत्त शुक‘वारी प्रकाशित केले. भविष्यातही अशी गावे बांधण्याचा चीनचा विचार आहे. या गावांच्या माध्यमातून उत्तराखंडच्या बाजूनेही भारताला घेरण्याचा चीनचा प्रयत्न आहे. पीपल्स लिबरेशन आर्मीच्या देखरेखीत उत्तराखंडला लागून असलेल्या सीमेजवळ ५५ ते ५६ घरे बांधण्यात येत आहेत. सीमेला लागून असलेल्या पूर्वेकडील सेक्टरमध्ये ४०० गावे वसविण्याची चीनची योजना आहे.
उत्तराखंडची चीनसोबत सुमारे ३५० किलोमीटरची सीमा आहे. उत्तराखंडमध्ये गेल्या काही वर्षांत स्थलांतर झपाट्याने वाढत आहे. रोजगार आणि मूलभूत सुविधांच्या अभावामुळे सीमावर्ती गावे रिकामी होत आहेत. ज्याचे नुकसान भारताला सहन करावे लागेल. याउलट चीन आपल्या लोकांना सीमेजवळ वसविण्याचे काम सातत्याने करीत आहे. चीनमधील ही गावे सर्व सुविधांनी सुसज्ज आहेत. चीनचा हा डाव उधळून लावण्यासाठी सीमेला लागून असलेल्या गावांमधील लोकांचे पुनर्वसन करण्यासाठी भारताकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
६ किमीचा बोगदा बनवण्याची तयारी
सीमेवर ६ किमी लांबीचा बोगदा बांधण्याची तयारी भारत करीत असल्याचे वृत्त बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या एका वरिष्ठ अधिकार्याने दिले. लिपुलेख खिंडीच्या शेवटच्या सीमा चौकीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग सुलभ करण्यासाठी हा बोगदा उत्तराखंडमधील घाटियाबागर-लिपुलेख रस्त्यावर बुंदी आणि गरबियांगदरम्यान बांधला जाणार आहे. सध्या याबाबत सर्वेक्षण सुरू आहे. सुमारे दोन हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प येत्या चार-पाच वर्षांत सुरू होऊ शकतो. अधिकार्याच्या मते, २०२० मध्ये पूर्ण झालेला सीमा रस्ता सध्या ब्लॅक टॉप आणि डबल लेनचा बनवला जात आहे. दुहेरी मार्गाचे बहुतांश काम जवळपास पूर्ण झाले आहे. म्हणजेच भारतही चीनचा सामना करण्यासाठी प्रत्येक आघाडीवर तयारीत व्यस्त आहे.