किमान तापमान : 25.41° से.
कमाल तापमान : 26.46° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 8.35 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.46° से.
23.58°से. - 26.99°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.33°से. - 27.04°से.
शनिवार, 25 जानेवारी टूटे हुए बादल25.05°से. - 27.61°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.42°से. - 28.19°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.65°से. - 27.75°से.
मंगळवार, 28 जानेवारी कुछ बादल25.13°से. - 26.87°से.
बुधवार, 29 जानेवारी घनघोर बादलनवी दिल्ली, (२६ मे) – भारत जगभरात स्टील उत्पादनात दुसर्यास्थानी असल्याचे वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने घोषित केले आहे. सर्वात जास्त उत्पादन चीनमध्ये होत असून जपान, अमेरिका, रशिया, दक्षिण कोरिया, जर्मनी, तुर्की, ब्राझील, इराण आदी देशांचा उत्पादक देशांच्या यादीत समावेश आहे. स्टील हा आर्थिक आणि औद्योगिकदृष्ट्या अतिशय महत्त्वपूर्ण धातू आहे. जगभरात पायाभूत सुविधांच्या निर्मितीमधील तो एक प्रमुख घटक मानला जातो. पुल, इमारतीसह अन्य निर्मितीसाठी त्याचा व्यापक रूपाने उपयोग करण्यात येतो. याशिवाय वाहन उद्योग, जहाज बांधणी, यंत्र निर्मिती, खत उत्पादन आदींमध्ये सुद्धा त्याचा उपयोग होतो.
वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सनुसार चीन हा एकटा देश जगातील अन्य उत्पादक देशांच्या उत्पादनाइतकेच करतो. जगातील एकूण स्टील उत्पादनात या देशाची भागीदारी ५३.९ टक्के आहे. भारत दुसर्यास्थानी असून, उत्पादनातील वाटा ६.६ टक्के इतका आहे. तिसर्या क्रमांकावर जपान (४.८ टक्के उत्पादन) असून, चौथ्या स्थानी अमेरिका (४.३ टक्के उत्पादन) आहे, तर ३.८ टक्के भागीदारीसह रशिया पाचव्या क‘मांकावर आहे. या संदर्भात उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी म्हटले की, ८० च्या दशकात मी स्टील उत्पादन क्षेत्रात पाऊल ठेवले होते. त्यावेळी जपान आपल्यापेक्षा समोर होता. आता अतिशय आनंद आहे की, भारताने जगात दुसरे स्थान राखले आहे.