किमान तापमान : 29.02° से.
कमाल तापमान : 29.09° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 64 %
वायू वेग : 5.63 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.02° से.
27.3°से. - 30.22°से.
रविवार, 17 नोव्हेंबर हल्की वर्षा27.95°से. - 31.2°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल26.92°से. - 31.17°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.02°से. - 30.17°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.59°से. - 30.1°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.4°से. - 29.75°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादल– सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी,
नवी दिल्ली, (०७ सप्टेंबर) – जेव्हा एखाद्या प्रकरणात एफआयआरला उशीर झाला असेल आणि त्याचे स्पष्टीकरण दिले गेले नाही, तर न्यायालयाने सतर्क असावे आणि अशा प्रकरणांमध्ये पुराव्यांची काळजीपूर्वक चाचणी घ्यावी, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने एका खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या दोन लोकांना निर्दोष सोडताना नोंदवली. १९८९ मध्ये खुनाच्या या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आरोपीच्या सुटकेचा आदेश दिला.
न्या. जे. बी. पार्डीवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या न्यायासनाने ही टिप्पणी केली. २५ ऑगस्ट १९८९ रोजी दोघांनी एका व्यक्तीची हत्या केल्याचा आरोप होता. दुसर्या दिवशी बिलासपूर जिल्ह्यात या प्रकरणात एफआयआर नोंदविण्यात आला. ५ सप्टेंबर रोजी दिलेल्या निकालात न्यायालयाने म्हटले आहे की, जेव्हा एफआयआरला उशीर होतो आणि कोणताही योग्य युक्तिवाद होत नाही, तेव्हा न्यायालयाने जागरूक असावे आणि सादर केलेल्या पुराव्यांची योग्य चाचणी घ्यावी.
प्रकरण असे…
हिरालाल आणि परसारामसह तीन जणांना खून प्रकरणात दोषी ठरविण्यात आले आणि न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यानंतर, उच्च न्यायालयात अपील करण्यात आले, फेब्रुवारी २०१० मध्ये छत्तीसगड उच्च न्यायालयानेही जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आरोपींनी आव्हान दिले. आता सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही आरोपींच्या सुटकेचा आदेश दिला आहे.
न्यायालयाने म्हटले आहे की, हत्येचे कोणतेही विशिष्ट कारण माहीत नाही. या खटल्याच्या चौकशीत अनेक महत्त्वाच्या मुद्यांचा तपास केला गेला नाही. त्याच वेळी, या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शीने देखील त्याचे विधान बदलले आहे, म्हणून त्याच्या साक्षीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते. या प्रकरणात एफआयआरलाही उशीर झाला आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.