किमान तापमान : 29.09° से.
कमाल तापमान : 30.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 58 %
वायू वेग : 6.84 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.99° से.
27.3°से. - 30.99°से.
रविवार, 17 नोव्हेंबर हल्की वर्षा27.85°से. - 31.56°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.12°से. - 31.57°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.41°से. - 30.38°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.74°से. - 30.38°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.37°से. - 29.74°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादल– प्रल्हाद जोशी यांचे सोनिया गांधींच्या पत्राला उत्तर,
नवी दिल्ली, (०७ सप्टेंबर) – भारतीय लोकशाहीचे मंदिर असलेल्या संसद भवनातील कामकाजाचे तुम्ही राजकारण करीत आहात, अनावश्यकपणे यातून नवा वाद उपस्थित करीत असल्याचा आरोप सांसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी गुरुवारी केला. संसदेचे पाच दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावताना सरकारने विरोधी पक्षांना विश्वासात घेतले नाही तसेच या अधिवेशनाची कार्यक्रम पत्रिकाही विरोधी पक्षांना दिली नाही, असा आरोप काँग्रेस सांसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या पत्रातून केला होता. या पत्राला उत्तर देताना प्रल्हाद जोशी यांनी हा आरोप खोडून काढला.
सांसदीय परंपरांच्या स्थापित प्रथेचे पालन करताना मंत्रिमंडळाच्या सांसदीय कामकाज विषयक समितीच्या शिफारसीनुसार राष्ट्रपतींनी संसदेचे पाच दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावले. संसदेचे अधिवेशन बोलावताना विरोधी पक्षांशी कधीच चर्चा केली जात नाही तसेच त्यांना कोणत्या मुद्यांवर अधिवेशनात चर्चा केली जाणार, हेही सांगितले जात नाही. मात्र, या परंपरेचा तुम्हाला विसर पडल्यासारखे दिसते. राष्ट्रपतींनी संसदेचे अधिवेशन बोलावल्यानंतर अधिवेशन व्हायच्या आधी विरोधी पक्षांची एक बैठक बोलावून त्यांना अधिवेशनातील कामकाजाची माहिती दिली जाते, असे जोशींनी पत्रात म्हटले आहे.
आमचे सरकार कोणत्याही मुद्यावर चर्चा करायला नेहमी तयार असते, असे स्पष्ट करीत जोशी म्हणाले, तुम्ही पत्रातून जे मुद्दे उपस्थित केले, त्या सर्व मुद्यांवर अविश्वास प्रस्तावावरील चर्चेंदरम्यान सरकारने उत्तर दिले आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनाची कार्यक्रम पत्रिका स्थापित परंपरेनुसार योग्यवेळी जारी केली जाईल. आमच्या सांसदीय प्रणालीत सरकार कोणत्याही पक्षाचे असो अधिवेशनाची कार्यक्रम पत्रिका कधीच आधी जाहीर करण्यात येत नाही. संसदेची प्रतिष्ठा कायम राखली जाईल तसेच या व्यासपीठाचा उपयोग राजकीय वादविवादासाठी होणार नाही, असा विश्वास व्यक्त करताना जोशी यांनी या अधिवेशनाचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी मी आपल्या सहकार्याची अपेक्षा करतो, जेणेकरून राष्ट्रीय हितासाठी व्यापक परिणाम समोर येतील, असे म्हटले.
Short URL : https://vrittabharati.in/?p=54808