किमान तापमान : 28.91° से.
कमाल तापमान : 31.63° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 47 %
वायू वेग : 7.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
31.63° से.
27.62°से. - 32.99°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल28.21°से. - 31.2°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.54°से. - 31.18°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.65°से. - 30.02°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.41°से. - 29.99°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश26.01°से. - 29.32°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादलपिठाच्या किमती कमी होणार,
नवी दिल्ली, (४ फेब्रुवारी ) – सध्या देशात गव्हाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. गव्हाच्या पीठाच्या किमतीदेखील वाढल्या आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी ३० लाख टन गहू बाजारात विक्रीसाठी आणला आहे. यातील पहिल्या आठवड्यात भारतीय अन्न महामंडळाकडून (एफसीआय) ९.२ लाख मेट्रिक टन गव्हाची विक्री झाली आहे. त्यामुळे आता लवकरच गव्हाच्या पिठाच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे.
देशातील अनेक राज्यांमध्ये गव्हाचा लिलाव सुरू झाला आहे. एफसीआयकडून गव्हाची विक्री केली जात आहे. एफसीआयने आयोजित केलेल्या गव्हाच्या लिलावात १,१५० पेक्षा अधिक बोलीदारांनी भाग घेतला. देशभरात सुमारे ९.२ लाख मेट्रिक टन गव्हाची विक्री झाली आहे. लवकरच उरलेल्या गव्हाचीही देखील एफसीआय स्तरावर विक्री होणार आहे. गव्हाच्या लिलावात पहिल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात बोली लावल्या होत्या. व्यापारी ५०० ते १००० दशलक्ष टन गहू खरेदी करण्यासाठी उपस्थित होते. केंद्र सरकारला कोणत्याही परिस्थितीत देशात गव्हाचा खप कमी होऊ द्यायचा नाही.
एफसीआय दर बुधवारी ई-लिलावाद्वारे गव्हाची विक्री करेल. किंबहुना, गव्हाच्या वाढत्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली मंत्र्यांच्या समितीने ई-लिलावाद्वारे गव्हाची विक्री करण्याची सूचना केली आहे. त्यानंतर हा कृती आराखडा राबवण्यात आला आहे. एफसीआयने २५ लाख मेट्रिक टनांपैकी २२ लाख मेट्रिक टन गहू ई-लिलावाद्वारे देऊ केला आहे. त्याचबरोबर एकूण ३० लाख मेट्रिक टन गहू बाजारात दाखल होणार असल्याचे सांगितले होते.