किमान तापमान : 29.26° से.
कमाल तापमान : 30.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 58 %
वायू वेग : 6.92 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.99° से.
27.3°से. - 30.99°से.
रविवार, 17 नोव्हेंबर हल्की वर्षा27.95°से. - 31.2°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल26.92°से. - 31.17°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.02°से. - 30.17°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.59°से. - 30.1°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.4°से. - 29.75°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादलनवी दिल्ली, (४ फेब्रुवारी ) – युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ घोषित केलेल्या कालका-शिमला रेल्वे मार्गावर हायड्रोेजन ट्रेन चालवण्यात येणार आहे. यासाठी कालका, शिमला आणि बरोग स्थानके हायड्रोजन इंधन स्टेशन म्हणून विकसित केली जाणार आहेत. देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन चालवण्यासाठी या स्थानकांची निवड करण्यात आली आहे. पाण्यातून हायड्रोजन काढून त्याचे इंधनात रूपांतर करण्यासाठी या स्थानकांवर प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. डिसेंबरपर्यंत कालका-शिमला मार्गावर हायड्रोजन ट्रेन चालवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. अर्थसंकल्पात नुकतीच अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी या ट्रेनची घोषणा केली.
याबाबत संबंधित अधिकार्यांनी कालका-शिमला रेल्वे विभागाचे सर्वेक्षणही केले आहे. सध्या या रेल्वे विभागात डिझेल लोकोमोटिव्ह कार्यरत आहेत. हायड्रोजन हे प्रदूषणविरहित स्वच्छ इंधन मानले जाते. हायड्रोजन इंधनाच्या वापरामुळे हानिकारक वायूंचे शून्य उत्सर्जन होते आणि फक्त पाण्याची वाफ होते, जी हवेसाठी पर्यावरणास अनुकूल मानली जाते. पहिल्या टप्प्यात हायड्रोजन ट्रेन फक्त नॅरोगेज ट्रॅकवर चालवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हरित इंधनावर आधारित रेल्वे गाड्या पुरवण्यासाठी डिझेल लोकोमोटिव्ह इंजिनचे हायड्रोजन इंजिनमध्ये रूपांतर करण्याचे रेल्वेचे उद्दिष्ट आहे. वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांप्रमाणे हायड्रोजनवर चालणार्या गाड्या चालवण्याची योजना आहे.
ही विशेष ट्रेन चेन्नईहून कालका येथे पोहोचली आहे. अंबाला रेल्वे विभागाला कालका-शिमलादरम्यान ट्रेन सेटची (इंजिनशिवाय तीन डबे असलेली हायस्पीड ट्रेन) चाचणी घेण्यास रेल्वे बोर्डाकडून परवानगी मिळाली आहे. आरडीएसओची (रिसर्च डिझाईन अॅण्ड स्टॅण्डर्ड्स ऑर्गनायझेशन) चमू या महिन्यात रेल्वे सेटची चाचणी सुरू करेल.
हायड्रोजन ट्रेनची वैशिष्ट्ये
– डिसेंबरपर्यंत भारतात प्रथमच धावणार
– ही ट्रेन पूर्णतः भारतात बनवण्यात आली
– हायड्रोेजन इंधनावर ही ट्रेन चालणार
– हायड्रोजन इंधनामुळे प्रदूषण नाही, ताशी १४० वेगाने धावणार, १ हजार किमीपर्यंतचे अंतर कापणार
– इलेक्ट्रिक ट्रेनच्या तुलनेत ही ट्रेन १० पट वेगाने धावणार
– २० मिनिटात या ट्रेनमध्ये इंधन भरता येते, त्यानंतर सलग १८८ तास धावते
– सुरुवातीला ८ विविध मार्गांवरून ट्रेन चालवणार, पहिली ट्रेन कालका-शिमला मार्गावरून धावणार