किमान तापमान : 29.02° से.
कमाल तापमान : 29.09° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 64 %
वायू वेग : 5.63 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.02° से.
27.3°से. - 30.22°से.
रविवार, 17 नोव्हेंबर हल्की वर्षा27.95°से. - 31.2°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल26.92°से. - 31.17°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.02°से. - 30.17°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.59°से. - 30.1°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.4°से. - 29.75°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादलनवी दिल्ली, १६ फेब्रुवारी – नेटफ्लिक्स आणि ऍमेझॉन प्राईमसारख्या ओटीटी मंचांवर नियंत्रण आवश्यक असून, याबाबत काही कार्यवाही करण्याचा आम्ही विचार करीत आहोत, असे केंद्र सरकारने आज मंगळावारी सर्वोच्च न्यायालयास सांगितले.
ओटीटी मंचांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वायत्त मंडळ स्थापन करा, अशी मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली असून, याबाबतच्या उपाययोजनांसाठी तुम्ही केंद्र सरकारसोबत संपर्क करा, असे सरन्यायाधीश शरद बोबडे, न्या. ए. एस. बोपन्ना आणि न्या. व्ही. रामसुब्रमणियन् यांचा समावेश असलेल्या तीन सदस्यीय न्यायासनाने सुरुवातीला याचिकाकर्त्याला सांगितले. नंतर या याचिकेवरून केंद्र सरकारला नोटिस जारी करून सहा आठवड्यांत उत्तर मागितले.
ओटीटी मंचांवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही कार्यवाही करण्याचा विचार केला जात आहे, असे केंद्र सरकारच्या वतीने युक्तिवाद करताना अतिरिक्त महान्यायाभिकर्ता संजय जैन यांनी न्यायालयास सांगितले. सरकार नेमकी कोणती कार्यवाही करेल, असे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी संजय जैन यांना विचारत, या प्रकरणी सहा आठवड्यांत उत्तर सादर करण्याचा निर्देश त्यांनी दिला. तसेच या याचिकेचा समावेश इतर काही याचिकांमध्ये केला.