किमान तापमान : 23.22° से.
कमाल तापमान : 23.68° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 6.13 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.22° से.
22.99°से. - 26.27°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
मंगळवार, 28 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलमुझफ्फरपूर, १६ फेब्रुवारी – आपल्या देशातील शेतकरी हा वैज्ञानिक आहे आणि शेती त्याची प्रयोगशाळा आहे. मागील दहा हजार वर्षांपासून देशात शेतीचीच परंपरा राहिली आहे. भारतातील कृषी क्षेत्र जगात सर्वांत प्रभावी आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी येथे केले.
भारतानंतर ज्या देशांनी कृषी क्षेत्रात प्रवेश केला, शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी अनावश्यक असे प्रयोग केले, त्या देशांमधील कृषी क्षेत्राची अवस्था अतिशय दयनीय आहे, असे विचारही डॉ. भागवत यांनी मांडले. रविवारी बिहारच्या मुझफ्फरपूर येथील औराईस्थित जैविक शेती प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर ते उद्बोधन करीत होते.
मोहनजींनी येथील दोन कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. सकाळी जैविक कृषी प्रकल्पाला भेट दिल्यानंतर त्यांनी शिक्षा संस्कृती विकास न्यास समितीतर्फे निर्मित मधुकर निकेतन भवनाचे लोकार्पण केले.
या लोकार्पण सोहळ्यात बोलताना ते म्हणाले की, हे भवन भारतीय परंपरेला अनुरूप असेच आहे. आगामी २० वर्षांच्या गरजा लक्षात घेऊन त्याची निर्मिती करण्यात आली आहे. समाजाच्या सर्व घटकातील लोकांच्या सेवेसाठी स्वयंसेवकांनी नेहमीच तत्पर असायला हवे, असे आवाहन त्यांनी केले.
समाजाची सेवा हीच आपल्या देशाची परंपरा राहिली आहे. भारत प्राचीन काळापासून जगाला ज्ञान देत आलेला आहे. भविष्यातही भारताची ही परंपरा अशीच सुरू राहील. सामंजस्य व समन्वयाने जीवन जगण्याची पद्धती ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. प्रेम आणि धर्माशी संलग्न राहून आपले पोषण करण्याची शिकवण भारत आजही जगाला शिकवत आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी ‘शताब्दी से सहस्राब्दी’ या पुस्तकाचे विमोचन केले. यावेळी या भवनाच्या उभारणीत तांत्रिकी सहकार्य देणार्यांचा मोहनजींच्या हस्ते सन्मान करण्यात आला.