किमान तापमान : 29.09° से.
कमाल तापमान : 29.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 58 %
वायू वेग : 5.63 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.99° से.
27.3°से. - 30.22°से.
रविवार, 17 नोव्हेंबर हल्की वर्षा27.95°से. - 31.2°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल26.92°से. - 31.17°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.02°से. - 30.17°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.59°से. - 30.1°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.4°से. - 29.75°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादल३० कोटींचा जमीन घोटाळा,
नवी दिल्ली, १६ फेब्रुवारी – ज्येष्ठ कॉंग्रेस नेते व हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुडा यांच्यासह चार निवृत्त आयएएस अधिकारी आणि इतरांवर मंगळवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) डझनभर औद्योगिक भूखंडांच्या वाटपात झालेल्या अनियमिततेशी निगडित आरोपपत्र दाखल केले. २०१३ मधील हा जमीन वाटप घोटाळा सुमारे ३० कोटी रुपयांचा असल्याची माहितीही अधिकार्यांनी दिली.
पात्र अर्जदारांना डावलून मुख्यमंत्री हुडा ज्या राजकीय पक्षाशी संबंधित होते त्यांच्याशी संबंधित असलेल्या अर्जदारांना हे भूखंड वाटप करण्यात आले होते, असा दावा केंद्रीय तपास संस्थेने केला. तत्कालीन मुख्यमंत्री हुडांच्या परिचितांना हे भूखंड देण्यात आले होते, असे अंमलबजावणी संचालनालयाने स्पष्टपणे सांगितले.
या कथित अनियमिततेच्या चौकशीसाठी हरयाणा दक्षता ब्युरोने २०१५ मध्ये गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) आणि ईडीने आपापले खटले दाखल केले.
इडीने भूपिंदरसिंह हुडा, सेवानिवृत्त आयएएस अधिकारी धर्मपालसिंह नागल (हुडांचे तत्कालीन मुख्य प्रशासक), सुरजितसिंह (हुडांचे तत्कालीन प्रशासक), सुभाषचंद्र कंसल (माजी मुख्य नियंत्रक, वित्त), भारत भूषण तनेजा (तत्कालीन अधीक्षक) यांच्यासह नरेंद्रकुमार सोलंकी (माजी विभागीय प्रशासक) यांच्यासह १४ लाभार्थ्यांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे.
पंचकुला येथील विशेष न्यायालयासमोर बेकायदेशीर सावकारी प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) विविध कलमांखाली ही तक्रार दाखल करण्यात आली आहे, असे ईडीने म्हटले.
गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचून हुडा तसेच सेवानिवृत्त आयएएस अधिकारी आणि पंचकुलातील हुडांच्या नजीकचे अन्य पदाधिकारी या बेकायदेशीर व्यवहारामुळे लाभान्वित झाले. तसेच पात्र अर्जदारांना डावलून तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या निवडक ओळखीच्या लोकांना १४ औद्योगिक भूखंडांचे वाटप करण्यात आले, असे आमच्या तपासात आढळून आले आहे असे ईडीने म्हटले आहे.