किमान तापमान : 26.15° से.
कमाल तापमान : 29.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 32 %
वायू वेग : 0.68 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.99° से.
23.43°से. - 29.99°से.
शनिवार, 25 जानेवारी छितरे हुए बादल24.93°से. - 27.39°से.
रविवार, 26 जानेवारी छितरे हुए बादल25.34°से. - 28.48°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.41°से. - 27.46°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.27°से. - 27.02°से.
बुधवार, 29 जानेवारी घनघोर बादल24.53°से. - 26.49°से.
गुरुवार, 30 जानेवारी टूटे हुए बादलन्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय,
नवी दिल्ली, १० ऑगस्ट – मुलगी प्रौढ, सुशिक्षित, कमावती तसेच शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी असेल तर तिला वडिलांकडून स्वखर्चासाठी पैशांची मागणी करण्याचा अधिकार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी न्यायालयाने दिला आहे.
तत्पूर्वी मुख्य महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयाने दिलेला निर्णय जिल्हा न्यायालयाने रद्दबातल ठरवला आहे. न्यायालयाने एका वडिलांच्या याचिकेवर सुनावणी करताना हा निकाल दिला.
२०१८ मध्ये मुख्य महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयाने एका याचिकेवर निकाल देताना, वडिलांनी मुलीला स्वत:च्या खर्चासाठी दरमहा तीन हजार रुपये देण्याचा आदेश दिला होता. न्यायालयाच्या या निकालाला आव्हान देत वडिलांनी अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी न्यायालयात याचिका दाखल केली होती. दरम्यान, या याचिकेत वडिलांनी मुलगी त्यांच्यासोबत राहत नसून, ती वेगळी राहात असल्याचे नमूद केले होते. हरयाणातील यमुनानगरमध्ये महानगर दंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देण्यासाठी अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी न्यायालयात याचिका दाखल केली होती. अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी नेहा नौहरिया यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली.
मुख्य महानगर दंडाधिकार्यांनी कलम १२५ अंतर्गत मुलीला स्वखर्चासाठी दरमहा ३ हजार रुपये देण्याचा आदेश दिला होता. त्यावर जिल्हा दंडाधिकारी न्यायालयाने कलम १२५ अंतर्गत मुलगी प्रौढ, सुशिक्षित, कमावती तसेच शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी असेल तर तिला वडिलांकडून स्वखर्चासाठी पैशांची मागणी करण्याचा अधिकार नाही, असा निकाल दिला आहे. अशातच यमुनानगरच्या न्यायालयाने दिलेला हा निर्णय अनेक बाजूंनी महत्त्वपूर्ण आहे.
रेल्वेमधून निवृत्त झालेले रमेश चंद्र यांचा आपल्या पत्नीसोबत बर्याच काळापासून वाद सुरू आहे. पत्नी आणि त्यांची मुलगी अनेक वर्षांपासून त्यांच्यासोबत राहात नाही. यापूर्वीच त्यांच्या पत्नीला तिच्या खर्चासाठी दरमहा एक हजार रुपये देण्याचा आदेश न्यायालयाने दिला. तसेच मुलीलाही दरमहा खर्चासाठी ३ हजार रुपये देण्यात येत होते. अशातच रमेश चंद्र यांचे वकील संदीप शर्मा यांनी न्यायालयात सांगितले की, मुलगी प्रौढ आहे तसेच ती शिक्षित आहे. त्यामुळे तिला वडिलांकडून खर्चासाठी पैसे मागण्याची अजीबात गरज नाही.