किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 23.7° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 49 %
वायू वेग : 2.22 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.94°से.
शनिवार, 25 जानेवारी छितरे हुए बादल24.93°से. - 27.39°से.
रविवार, 26 जानेवारी छितरे हुए बादल25.34°से. - 28.48°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.41°से. - 27.46°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.27°से. - 27.02°से.
बुधवार, 29 जानेवारी घनघोर बादल24.53°से. - 26.49°से.
गुरुवार, 30 जानेवारी टूटे हुए बादलकराची बंदर केले होते उद्ध्वस्त, दोन युद्धनौका आणि विनाशिकाही उडविली,
चेन्नई, १० ऑगस्ट – १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धातील नायक आणि महावीर चक्र देऊन सन्मान करण्यात आलेले कमोडोर गोपाल राव यांचे चेन्नईत निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. त्यांच्यामागे एक मुलगा, दोन मुली व आप्तपरिवार आहे.
कासरगोड पटनाशेट्टी गोपाल राव एमव्हीसी व्हीएसएम असे त्यांचे पूर्ण नाव होते. १९७१ च्या ऐतिहासिक विजयाला नुकतीच ५० वर्ष पूर्ण झाली. विजयाच्या या सुवर्णमहोत्सवी वर्षात नुकताच त्यांचा भारत सरकारकडून विशेष सन्मान करण्यात आला होता. त्यानंतर काही दिवसांतच त्यांची प्राणज्योत मालवली.
‘ऑपरेशन ट्रायडंट’मधील जबरदस्त कामगिरी
१३ नोव्हेंबर १९२६ रोजी जन्मलेल्या गोपाल राव यांचे सर्वोच्च कर्तृत्व दिसले ते पाकिस्तान विरुद्धच्या ऑपरेशन ट्रायडंटच्या वेळी. ४ डिसेंबर १९७१ ची ती भयंकर रात्र होती. भारताच्या सागरी हद्दीतून पाकिस्तानमधील कराचीपर्यंत पोहोचून तिथे बॉम्बस्फोट घडवून कराची बंदरच पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची धाडसी कामगिरी राव यांनी आखली होती. त्यासाठी त्यांना पाकिस्तानकडून होणार्या विविध प्रकारच्या हल्ल्यांना तोंड द्यावे लागणार होते.
पाकिस्तानकडून समुद्रातील युद्धनौकांकडून होणारे हल्ले आणि त्याचवेळी हवाई मार्गे होणारे हल्ले यातील कशाचीही पर्वा न करता राव यांनी पाकिस्तानच्या कराची बंदरापर्यंत धडक देण्याची योजना आखली आणि ती यशस्वी करून दाखवली. टास्क फोर्सचे नेतृत्व करीत ते कराची बंदरावर पोहोचले आणि तिथे त्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणले.
बांगलादेश निर्मितीतील ही एक अत्यंत महत्त्वाची घटना होती. या हल्ल्यात राव यांनी दोन युद्धनौका आणि एक पाकिस्तानी विनाशिकाही स्फोटाने उडवण्यात यश मिळवले. पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्यापूर्वीच भारताने ही कारवाई केल्यामुळे पाकला केवळ हात चोळत बसण्याशिवाय काहीही कता आले नाही.