किमान तापमान : 23.81° से.
कमाल तापमान : 23.93° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.93° से.
23.71°से. - 24.88°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल– छाप्यानंतर पहिल्यांदाच धीरज साहू कॅमेर्यासमोर आला,
नवी दिल्ली, (१६ डिसेंबर) – ६ डिसेंबर रोजी आयकर विभागाने काँग्रेस खासदार धीरज साहू यांच्या घरावर छापा टाकला होता. छाप्यानंतर रोकडने भरलेल्या १७६ पोती जप्त करण्यात आल्या. सुमारे ४० नोटा मोजण्याचे यंत्र पाच दिवस ही रोकड मोजत राहिले. मोजणीनंतर काँग्रेस खासदाराच्या घरातून ३५३ कोटी रुपये वसूल झाल्याचे समोर आले. या छाप्यानंतर पहिल्यांदाच धीरज साहू आता कॅमेर्यासमोर आला आहे. हे पैसे कोणाचे आहेत हे साहू यांनी सांगितले आहे. काळ्या पैशाबाबतच्या प्रश्नालाही त्यांनी उत्तर दिले आहे.
धीरज साहू यांना विचारण्यात आले की, जप्त केलेला पैसा काळा पैसा आहे, यावर तुम्ही काय म्हणाल? साहू म्हणाले, ’आमच्या मालकीचे सर्व व्यवसाय माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर आहेत. भाजपा त्याला काळा पैसा कसा म्हणत आहेत, हे केवळ आयकर विभागच सांगू शकेल. काळा पैसा आहे की पांढरा पैसा आहे, याचे उत्तर प्राप्तिकरावर येऊ द्या. धीरज साहू पुढे म्हणाले, ’मी व्यवसायात नाही… यावर माझे कुटुंबीय उत्तर देतील. मी या प्रकरणापासून पूर्णपणे दूर आहे. माझे कुटुंब खूप मोठे आहे. मी ३०-३५ वर्षांपासून राजकारणात आहे. याशिवाय मला अधिक माहिती द्यायची नाही.
धीरज साहू यांना विचारण्यात आले की हा छापा काँग्रेस पक्षाशी संबंधित आहे का? त्यावर ते म्हणाला, ’बघा… हा आयकर छापा आहे. लोक ते कसे पाहतात हे आम्हाला माहित नाही. मी कोणत्याही पक्षाला दोष देत नाही. पण मी एवढेच सांगू शकतो की हा पैसा काँग्रेस पक्षाचा किंवा इतर कोणत्याही पक्षाचा नाही आणि हे मी ठामपणे सांगत आहे. विशेष म्हणजे खासदार धीरज साहू यांच्याशी संबंधित डझनभर ठिकाणी आयकर विभागाने छापे टाकले होते. तीन राज्यात हे छापे टाकण्यात आले. छापेमारीनंतर एकूण ३५३ कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच एका कारवाईत एवढा पैसा जप्त करण्यात आला आहे. आता या छापेमारीनंतर धीरज साहू यांचे पहिले वक्तव्य आले आहे. या पैशाचे वर्णन त्यांनी आपल्या कुटुंबाचे पैसे असे केले आहे.