किमान तापमान : 28.18° से.
कमाल तापमान : 31.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 23 %
वायू वेग : 2.07 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
31.99° से.
24.78°से. - 31.99°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.19°से. - 28.47°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल24.71°से. - 28.37°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.31°से. - 28.43°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर घनघोर बादल23.48°से. - 27.57°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादल23.34°से. - 27.92°से.
रविवार, 01 डिसेंबर छितरे हुए बादलनवी दिल्ली, (२९ मार्च) – केंद्र सरकारने राहुल गांधी यांना सरकारी निवासस्थान सोडण्यासंदर्भात नोटीस बजावल्यानंतर आता काँग्रेस पक्षाने देशभरात ‘माझे घर राहुल गांधींचे घर’, अशी मोहीम देशभरात सुरू केली आहे. राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा, त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द आणि सरकारी निवासस्थान सोडण्याची कारवाई या तिन्ही गोष्टी काही तासांच्या अंतराने घडून आल्या. त्यामुळे काँग्रेस पक्षाकडून तीव्र निषेध व्यक्त होत आहे. याशिवाय देशभरात काँग्रेस नेते, समर्थकांनी माझे घर राहुल गांधींचे घर, ही मोहीम सुरू केली आहे. काँग्रेसशासित राज्यांतील मंत्री, आमदारांपासून सामान्य कार्यकर्त्यांनी राहुल गांधींना समर्थन दिल्याचे दिसून येत आहे.
काशी येथील माजी मंत्री तसेच आमदार अजय राय यांनी आपल्या घरावर पोस्टर लावले आहे. या संदर्भात ते म्हणाले की, देशभरात केंद्र सरकारकडून लोकशाहीची हत्या होत आहे. सुरुवातीला राहुल गांधी यांची खासदारकी हिरावून घेतली. यानंतर सरकारी निवासस्थान सुद्धा रिकामे करण्यासंदर्भात नोटीस देण्यात आली. गांधी कुटुंबाने देशासाठी बलिदान दिले तसेच प्रयागराज येथील आनंद भवन सरकारला दान स्वरूपात दिले. राहुल गांधी देशवासीयांच्या मनात राहात आहे. घर ही साधारण गोष्ट असल्याची भावना नेत्यांनी व्यक्त केली. दरम्यान, अनेकांनी आपल्या घरावर माझे घर राहुल गांधींचे घर, अशा आशयाचे लावलेले पोस्टर समाज माध्यमातून व्हायरल होत आहेत.