किमान तापमान : 28.53° से.
कमाल तापमान : 28.84° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 36 %
वायू वेग : 1.7 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.84° से.
24.16°से. - 28.99°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर घनघोर बादल23.61°से. - 28.82°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल24.07°से. - 28.75°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.01°से. - 28.78°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर घनघोर बादल23.12°से. - 27.87°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादल22.59°से. - 28.12°से.
रविवार, 01 डिसेंबर छितरे हुए बादल– तेव्हाच द्वेषमूलक भाषण थांबतील,
नवी दिल्ली, (२९ मार्च) – ज्यावेळी धर्म आणि राजकारण या गोष्टी एकमेकांपासून वेगळ्या होतील, त्यावेळी याचा गैरफायदा घेणारे लोक द्वेष निर्माण करणारे भाषण किंवा चिथावणीखोर वक्तव्य करणार नाहीत, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. चिथावणीखोर भाषण देणार्यांवर तीव्र आक्षेप घेत न्यायालयाने, लोक स्वतःवर नियंत्रण का ठेवत नाहीत, असा सवाल केला.
यावेळी न्यायालयाने माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या भाषणांचा संदर्भ देत सांगितले की, या नेत्यांची भाषणे समाजाला जोडणारी असायची, त्यांची भाषणे ऐकण्यासाठी दूरदूरच्या भागातून लोक जमायचे. चिथावणीखोर वक्तव्य करणार्या किती जणांवर न्यायालयाने कारवाई करायची, असा सवाल न्या. के. एम. जोसेफ आणि न्या. बी. व्ही. नागरत्न यांच्या न्यायालयाने केला.
महान्यायाभिकर्ता काय म्हणाले?
महान्यायाभिकर्ता तुषार मेहता यांनी केरळमधील एका व्यक्तीने एका विशिष्ट समुदायाविरोधात केलेल्या अवमानकारक भाषणाकडे न्यायासनाचे लक्ष वेधले. ते म्हणाले की, याचिकाकर्त्या शाहीन अब्दुल्ला यांनी देशातील द्वेषपूर्ण भाषणांच्या घटनांचा निवडक उल्लेख केला आहे. याआधी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की, देशात जातीय सलोखा राखण्यासाठी द्वेषयुक्त भाषण न करणे ही मूलभूत गरज आहे. अशा प्रकरणांमध्ये एफआयआरनुसार काय कारवाई केली आहे, अशी विचारणा न्यायालयाने मेहता यांना केली. कारण केवळ तक्रार दाखल करून समस्या सुटणार नाही, त्यांच्यावर कारवाई करणे गरजेचे आहे, असे न्यायालयाने सांगितले.