|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:39 ए एम | सूर्यास्त : 5:51 पी एम
हवामान

किमान तापमान : 27.04° से.

कमाल तापमान : 27.13° से.

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 41 %

वायू वेग : 2.74 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

27.04° से.

हवामानाचा अंदाज

24.83°से. - 28.52°से.

मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.69°से. - 28.91°से.

बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.85°से. - 28.87°से.

गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.96°से. - 28.66°से.

शुक्रवार, 29 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

23.35°से. - 28.38°से.

शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

22.91°से. - 28.26°से.

रविवार, 01 डिसेंबर छितरे हुए बादल
Home » राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान » ‘अमोघ-३’ उडवणार शत्रूच्या रणगाड्यांच्या चिंधड्या

‘अमोघ-३’ उडवणार शत्रूच्या रणगाड्यांच्या चिंधड्या

– क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी,
नवी दिल्ली, (२९ मार्च) – भारत डायनामिक्स लि.ने अलिकडेच तिसर्या पिढीतील रणगाडाविरोधी दिशादर्शक मॅन पोर्टेबल क्षेपणास्त्र ‘अमोघ-३’ची यशस्वी चाचणी घेतली आहे. शत्रूच्या रणगाड्यांच्या चिंधड्या उडवण्याची क्षमता असलेले हे क्षेपणसस्त्र खांद्यावर वाहून कुठेही नेले जाऊ शकते. कुठूनही शत्रूचा रणगाडा उद्ध्वस्त करण्याची क्षमता यात आहे.
अमोघ-३ हे रणगाडाविरोधी दिशादर्शक क्षेपणास्त्र अत्यंत आधुनिक असून, अचूक मारा करण्याची क्षमता यात आहे. नव्या क्षेपणास्त्राची मारक क्षमता २०० मीटर ते २५०० मीटर आहे. थेट वरतून किंवा सरळ रेषेत येत लक्ष्याला हे क्षेपणास्त्र उद्ध्वस्त करते. यातील स्फोटके ६५० मिमी बियॉन्ड एक्सप्लोजिव्ह रिअ‍ॅक्टर आर्मरच्याही (रणगाडा विरोधी क्षेपणास्त्राचा वार सहन करण्यास सक्षम) ठिकर्या उडवू शकतात.
डागण्यासाठी वापरला जातो ट्रायपॉड
क्षेपणास्त्रात ड्युएल मोड इमेजिंग इन्फ्रारेड सीकरचा वापर करण्यात आला आहे. म्हणजेच हे क्षेपणास्त्र अंधारातही लक्ष्याची ओळख पटवून ते नष्ट करण्यास सक्षम आहे. लक्ष्याच्या दिशेने झेपावत असताना याचा आवाज कमी असतो तसेच धूरही कमी निघतो. अमोघ-३ डागतानाही फारसा आवाज येत नाही. भविष्यात हे हलके लढाऊ हेलिकॉप्टर रुद्र आणि हल्ला करणार्या प्रचंड हेलिकॉप्टरवर तैनात करण्याची योजना आहे.
डागा आणि विसरा
अमोघ-३ च्या वेगाची माहिती उत्पादक कंपनीने दिलेली नाही. मात्र, इन्फ्रारेड इमेजिंग आणि इलेक्ट्रो-ऑप्टिकल तंत्रज्ञानाची मदत या क्षेपणास्त्राला होते. डागल्यावर नियंत्रित करणे शक्य व्हावे, यासाठी या क्षेपणास्त्राला आठ लहान लहान पंख दिले आहेत. हे क्षेपणास्त्र ‘फायर अ‍ॅण्ड फर्गेट’ अर्थात् डागा आणि विसरा या तंत्रज्ञानावर काम करते.
वजन कमी करणार
स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून या क्षेपणास्त्राची निर्मिती करण्यात आला. याचे वजन १८ किलो आहे. मात्र, ते १५ ते १६ किलोवर आणण्याची योजना आहे. वेगाने उत्पादन घेण्यासाठी कंपनी क्षेपणास्त्राच्या आणखी काही चाचण्या घेणार आहे. याची शेवटची चाचणी २६ मार्च रोजी होईल.

Posted by : | on : 29 Mar 2023
Filed under : राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g