किमान तापमान : 23.99° से.
कमाल तापमान : 24.65° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 60 %
वायू वेग : 3.29 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
23.99°से. - 28.52°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर घनघोर बादल23.69°से. - 28.91°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.85°से. - 28.87°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.96°से. - 28.66°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर घनघोर बादल23.35°से. - 28.38°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादल22.91°से. - 28.26°से.
रविवार, 01 डिसेंबर छितरे हुए बादल– एनसीएलएटीचा दणका,
नवी दिल्ली, (२९ मार्च) – वैध व्यापारी नियमावलीचे उल्लंघन केल्याचा आरोप झालेल्या तंत्रज्ञान क्षेत्रातील गुगल कंपनीला आता राष्ट्रीय कंपनी कायदा अपिलीय न्यायाधिकरणाने (एनसीएलएटी) मोठा दणका दिला आहे. भारतीय स्पर्धा आयोग अर्थात् सीसीआयने ठोठावलेला १,३३७ कोटी रुपयांचा दंड एनसीएलएटीने कायम ठेवला आहे. गुगलला दंड भरण्यासाठी आणि आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी एनसीएलएटीने ३० दिवसांची मुदत दिली आहे.
अँड्रॉईड स्मार्टफोन ऑपरेटिंग सिस्टिममधील एकाधिकारशाहीचा गैरवाजवी लाभ उठवल्याचा दावा करीत आयटी क्षेत्रातील कंपनी गुगलला सीसीआयने १,३३७ कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. या विरोधात एनसीएलएटीने गुगलला कोणत्याही स्वरूपाचा दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर या कंपनीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. ही दंडाची कारवाई अयोग्य असल्याचा दावा गुगलने एनसीएलटीसमोर केला होता.
एनसीएलएटीने सीसीआयने दिलेल्या आदेशावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर १५ फेब्रुवारी रोजी सुनावणी सुरू केली होती. सर्वोच्च न्यायालयाने एनसीएलएटीला ३१ मार्चपर्यंत अपिलावर निर्णय घेण्यास सांगितले होते. अपिलीय न्यायाधिकरणासमोर या प्रकरणी युक्तिवाद करीत गुगलने सांगितले होते की, मोबाईल अॅप्लिकेशन वितरण कराराद्वारे (एमएडीए) डिव्हाइसवर अॅप्सचे प्री-इन्स्टॉलेशन करणे अयोग्य नाही. कारण, इतर अॅप्स इन्स्टॉलिंग करण्यात कोणतेही बंधन नाही आणि त्यांच्यासाठी पुरेशी जागा आहे. यापूर्वी एनसीएलएटीने ४ जानेवारी रोजी गुगलच्या याचिकेवर नोटीस जारी केली होती आणि सीसीआयने ठोठावलेल्या १,३३७ कोटी रुपयांच्या दंडाच्या १० टक्क रक्कम भरण्याचा निर्देश दिला होता.