किमान तापमान : 25.5° से.
कमाल तापमान : 27.83° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 47 %
वायू वेग : 9.86 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.83° से.
23.58°से. - 28.99°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.33°से. - 27.04°से.
शनिवार, 25 जानेवारी टूटे हुए बादल25.05°से. - 27.61°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.42°से. - 28.19°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.65°से. - 27.75°से.
मंगळवार, 28 जानेवारी कुछ बादल25.13°से. - 26.87°से.
बुधवार, 29 जानेवारी घनघोर बादललोकसभेत गदारोळ,
नवी दिल्ली, २८ जुलै –
पेगासस हेरगिरी प्रकरण, शेतकरी आंदोलन, महागाई तसेच अन्य मुद्यावरून आज बुधवारी लोकसभेत अभूतपूर्व गोंधळ झाला. विरोधी सदस्यांनी शासकीय कामकाजाचे कागद फाडत त्याचे तुकडे पीठासीन अध्यक्ष आणि मंत्र्यांच्या अंगावर भिरकावले. या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज अनेकवेळा स्थगित करावे लागले.
आज लोकसभेच्या कामकाजाला प्रारंभ होताच सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. कॉंग्रेस आणि तृणमूल कॉंग्रेसच्या सदस्यांनी वेलमध्ये धाव घेत जोरदार घोषणाबाजी केली.
आज प्रश्नोत्तराचा तास चालवण्याचा निर्धार बिर्ला यांनी केला होता. सदस्यांची घोषणाबाजी सुरू असताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्रसिंह आणि विधि तसेच न्याय मंत्री किरेन रिजिजू यांनी प्रश्नांची उत्तरे दिली.
प्रश्नोत्तराच्या तासानंतर कामकाज सुरू होताच कॉंग्रेस, तृणमूल कॉंग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांच्या सदस्यांनी वेलमध्ये धाव घेत जोरदार घोषणाबाजी केली. विरोधी सदस्य आज नेहमीपेक्षा जास्त आक्रमक दिसत होते. कॉंग्रेसच्या सदस्यांनी शासकीय कागद फाडत त्याचे तुकडे आधी पीठासीन अध्यक्ष राजेंद्र अग्रवाल आणि नंतर मंत्र्यांच्या दिशेने उडवले. यामुळे सभागृहात गोंधळ उडाला.
१० खासदार होणार निलंबित?
लोकसभेत कागदाचे तुकडे भिरकावण्यात गुरुजीतसिंह औजला, टी. एन. प्रथपन, मनिकम् टॅगोर, रवनीतसिंह बिट्टू, हिबी इडन, ज्योतिमणी सेन्निमलई, सप्तगिरी शंकर उलाका, व्ही. वैथिलिंगम् आणि ए. एम. आरिफ हे खासदार आघाडीवर होते. या खासदारांचे सदस्यत्व निलंबित करण्याचा प्रस्ताव उद्या सरकारतर्फे संसदेत मांडला जाण्याची शक्यता आहे.
विरोधकांच्या हातात मोठे बॅनर
विरोधी सदस्य हातात एक मोठे बॅनर घेऊन आले होते. त्यावर पेगासस प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी होती. आक्रमक विरोधी सदस्यांनी हातातील बॅनरही वर फेकले. ते प्रेस गॅलरीत येऊन पडले. परिस्थिती हाताबाहेर जात आहे, हे लक्षात घेऊन अग्रवाल यांनी कामकाज १२.३० वाजेपयर्र्त स्थगित केले. दुपारी १२.३० वाजता कामकाज सुरू होताच पुन्हा गोंधळ झाला, त्यामुळे कामकाज दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले. त्यानंतरही गोंधळ कायम होता. पीठासीन सभापतींनी महत्त्वाचे मुद्दे मांडण्यासाठी सदस्यांची नावे पुकारली. या गोंधळातच काही सदस्यांनी नियम ३७७ चे मुद्दे मांडले. गोंधळ शांत होत नसल्यामुळे शेवटी अग्रवाल यांनी कामकाज २.३० वाजेपर्यंत स्थगित केले. त्यानंतरही गोंधळ कायमच होता.