किमान तापमान : 24.97° से.
कमाल तापमान : 24.98° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 55 %
वायू वेग : 4.96 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.98° से.
23.58°से. - 26.11°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.36°से. - 27.01°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश24.95°से. - 27.79°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.46°से. - 28.06°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.51°से. - 27.86°से.
मंगळवार, 28 जानेवारी कुछ बादल25.2°से. - 26.87°से.
बुधवार, 29 जानेवारी कुछ बादलनवी दिल्ली, २८ जुलै – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदावर विराजमान झालेल्या ममता बॅनर्जी यांनी आज बुधवारी येथे कॉंग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. देशातील ज्वलंत प्रश्नांपासून अनेक मुद्यांवर त्यांच्यात चर्चा झाली असून, विरोधकांना एकवटण्याचा विडा उचलला आहे, अशी माहिती ममता बॅनर्जी यांनी या भेटीनंतर दिली. या बैठकीसाठी खासदार राहुल गांधी देखील उपस्थित होते.
बैठकीनंतर ममता बॅनर्जी म्हणाल्या की, भाजपाला पराभूत करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्रित झाले पाहिजे. राजकारणातील सद्य:स्थिती आणि विरोधी पक्षातील ऐक्य यावर कॉंग्रेस नेत्यांशी चर्चा झाली, असे सोनिया गांधींशी झालेल्या बैठकीसंदर्भात ममता बॅनर्जी माध्यमांशी बोलताना म्हणाल्या.
ममता पुढे म्हणाल्या, भाजपाला पराभूत करण्यासाठी प्रत्येकाने एकत्रित होणे आवश्यक आहे. विरोधी पक्षातील ऐक्यात तुमची भूमिका काय असेल? या प्रश्नावर ममता म्हणाल्या, आम्ही नेते नाही, तर कार्यकर्ते आहोत. पेगासस हेरगिरीच्या मुद्यावर केंद्राने संसदेत उत्तर द्यायला हवे, अशी मागणीही त्यांनी केली.
ममता बॅनर्जी सध्या दिल्ली दौर्यावर आहेत. मंगळवारी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही भेट घेतली आणि कोरोना लसीकरण व अन्य मुद्यांवर त्यांच्याशी चर्चा केली.
सोनिया गांधींशी झालेल्या भेटीपूर्वी ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. पेगासस प्रकरणावर ममता बॅनर्जी म्हणाल्या की माझा व अभिषेकचा फोन ‘हॅक’ झाला आहे. वृत्तपत्र स्वातंत्र्यावर गदा आली आहे. अधिवेशनात विरोधकांचा आवाज दडपला जात आहे, असा आरोपही ममता बॅनर्जी यांनी केला. आणिबाणीच्या कालखंडापेक्षाही या वेळची परिस्थिती अधिक गंभीर आहे, असा दावाही त्यांनी केला. ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या, आता बर्याच राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. आम्ही संसद अधिवेशनानंतर सर्व राजकीय पक्षांशी चर्चा करू. सर्वांनी विरोधी आघाडीवर गांभीर्याने काम केले, तर अपेक्षित परिणाम दिसून येतील, असेही त्या म्हणाल्या. आज मी सोनिया गांधींची भेट घेतली. आता अरविंद केजरीवाल यांचीही भेट घेणार आहे तसेच लालूप्रसाद यादव यांच्याशीही बोलणे झाले आहे. आता सर्वांनी एकत्र येण्याची वेळ आली आहे, असेही ममता बॅनर्जींनी सांगितले.