किमान तापमान : 23.43° से.
कमाल तापमान : 24.3° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 53 %
वायू वेग : 4.78 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.43° से.
22.99°से. - 27.01°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश24.95°से. - 27.79°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.46°से. - 28.06°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.51°से. - 27.86°से.
सोमवार, 27 जानेवारी कुछ बादल25.2°से. - 26.87°से.
मंगळवार, 28 जानेवारी कुछ बादल24.73°से. - 26.29°से.
बुधवार, 29 जानेवारी घनघोर बादलब्लिंकेन यांचे प्रतिपादन, एस. जयशंकर यांच्यासोबत चर्चा
नवी दिल्ली, २८ जुलै – भारत-अमेरिकेचा मानवी सन्मान, कायद्याचे राज्य आणि मूलभूत स्वातंत्र्यावर विश्वास आहे. दोन्ही देश एकत्र येऊन काम करण्यास सक्षम आहेत आणि हे काम आम्ही येता काही महिन्यांत करू, असे प्रतिपादन अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री ऍन्टोनी ब्लिंकेन यांनी आज बुधवारी त्यांचे भारतातील समकक्ष एस. जयशंकर यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर केले.
सर्व लोकांना त्यांच्या सरकारच्या विरोधात आवाज उठविण्याचा अधिकार आहे आणि ते कुणीही असले, तरी त्यांचा आदर केला जाईल. मानवी सन्मान, समसमान संधीचा अधिकार, कायद्याचे राज्य, मूलभूत अधिकारांसह दोन्ही देशांमध्ये धार्मिक स्वातंत्र्य आहे, असे त्यांनी सांगितले.
भारत आणि अमेरिकेतील लोकशाही प्रगतिपथावर आहे आणि मित्र म्हणून आम्ही चर्चा करतो. कारण, लोकशाही बळकट करण्यासाठी कठोर परिश्रम करणे बहुतांश वेळी आव्हानात्मक होते, असे मत त्यांनी व्यक्त केले. ऍन्टोनी ब्लिंकेन यांचे देशात मंगळवारी रात्री आगमन झाले. ते दोन दिवसांच्या भारत दौर्यावर आहेत. बायडेन प्रशासनासोबत दृढ आणि वाढती द्विपक्षीय भागीदारी अधिक बळकट करण्याच्या धोरणात्मक मुद्दा या दौर्यातील चर्चेच्या केंद्रस्थानी राहणार आहे.
भारत ही आघाडीची जागतिक शक्ती आणि अमेरिकेचा भारत-प्रशांत आणि त्या पलीकडीलही महत्त्वपूर्ण भागीदार आहे, असे अमेरिकेने भारतातील दूतावासात जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
अजित डोवाल यांच्यासोबत चर्चा
भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासोबत ऍन्टोनी ब्लिंकेन यांनी चर्चा केली. सुरक्षा, संरक्षण, आर्थिक आणि तंत्रज्ञान क्षेत्राच्या मुद्यावर त्यांच्यात चर्चा झाली. भारत आणि अमेरिकेचे संबंध दीर्घकाळासाठी आणखी बळकट करण्याच्या मुद्यावरही त्यांच्यात चर्चा झाली.
भारत-अमेरिका भागीदारी सर्वांत महत्त्वाची
ब्लिंकेन आज सकाळी येथे दिल्लीतील नागरी संघटनेच्या पदाधिकार्यांसोबत झालेल्या बैठकीत सहभागी झाले. भारत-अमेरिकेतील भागीदारी जगातील सर्वांत महत्त्वाची भागीदारी आहे, असे ब्लिंकेन यांनी या बैठकीत सांगितले.