|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 7:02 ए एम | सूर्यास्त : 6:18 पी एम
हवामान

किमान तापमान : 23.14° से.

कमाल तापमान : 23.43° से.

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 48 %

वायू वेग : 4.26 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

23.14° से.

हवामानाचा अंदाज

22.99°से. - 26.45°से.

शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

24.98°से. - 27.28°से.

शनिवार, 25 जानेवारी कुछ बादल
हवामानाचा अंदाज

25.48°से. - 28.18°से.

रविवार, 26 जानेवारी छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

25.59°से. - 27.73°से.

सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.32°से. - 27.45°से.

मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

24.72°से. - 26.64°से.

बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादल
Home » नागरी, राष्ट्रीय » ‘ढोलविरा’ जागतिक वारसा स्थळांच्या यादीत

‘ढोलविरा’ जागतिक वारसा स्थळांच्या यादीत

युनेस्कोची घोषणा; पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद,
नवी दिल्ली, २८ जुलै – जगप्रसिद्ध व अतिप्राचीन हडप्पा संस्कृतीतील एक प्रमुख अवशेष असलेल्या गुजरातमधील ढोलविराचा समावेश आता जागतिक वारसा स्थळांच्या यादीत करण्यात आला आहे. अशा आशयाची घोषणा युनेस्कोने आपल्या जागतिक वारसा समितीच्या ४४ व्या बैठकीत केली आहे. युनेस्कोच्या या निर्णयानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आनंद व्यक्त केला आहे.
गुजरातमधील ढोलविराचा जागतिक वारसा यादीत सामावेश केल्याने आता भारतातील या यादीत असणार्‍या स्थळांची संख्या ४० इतकी झाली आहे. तसेच या यादीत जागा मिळवणारे ढोलविरा आता चंपानेर, पाटनच्या राणी की बाव आणि अहमदाबादनंतर गुजरातमधील चौथे स्थळ बनले आहे.
इसवी सन पूर्व २५०० वर्षांपूर्वी भारतात सिंधू नदीच्या काठी हडप्पा ही नागरी संस्कृती वसली होती. गुजरातमधील ढोलविरा हे ठिकाण हडप्पा संस्कृतीचाच एक भाग असून, १९६८ साली त्याचा शोध लागला. ढोलविरा म्हणजे हडप्पाकालीन पाण्याचे अप्रतिम नियोजन असलेले एक आदर्श ठिकाण म्हणून ओळखले जाते. या शहराला संरक्षणासाठी अनेकस्तरीय भिंती बांधण्यात आल्या होत्या. ढोलविरामधील बांधकामामध्ये दगडांचा वापर करण्यात आल्याचे दिसून येते, जे आपल्याला इतर हडप्पाकालीन ठिकाणी दिसत नाही. येथील मृतदेह पुरण्याच्या ठिकाणाचे बांधकाम हे आदर्श असेच होते.
ढोलविरामध्ये कॉपर, शेल, दगड, दागिने, टेराकोटा आणि प्राण्याच्या शिंगांचे अवशेष सापडले आहेत. या वस्तूंचा अभ्यास केल्यास हडप्पाकालीन संस्कृती किती समृद्ध होती याचा अंदाज येतो.
ढोलविरा हे गुजरातमधील कच्छ या जिल्ह्यात वसलेले आहे. आतापासून विचार केला, तर हे ठिकाण जवळपास ४५०० वर्षांपूर्वीचे असून, या ठिकाणाचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश व्हावा म्हणून केंद्र सरकारने २०१४ सालापासून प्रयत्न सुरू केले होते.
ढोलविरा हे ठिकाण हडप्पाकालीन एक महत्त्वाचे नागरी ठिकाण असून, ते आपल्याला आपल्या समृद्ध भूतकाळाशी जोडते. विशेषत: ज्या लोकांना इतिहास, संस्कृती आणि पुरातत्त्वशास्त्राची आवड आहे अशांनी तर या ठिकाणी भेट द्यायलाच हवी, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
तेलंगणातील रुद्रेश्‍वर (रामप्पा) मंदिराचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत केल्याची घोषणा रविवारी युनेस्कोने केली होती. आता त्यानंतर ढोलविराचा समावेश करण्यात आला आहे.

Posted by : | on : 29 Jul 2021
Filed under : नागरी, राष्ट्रीय
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g