किमान तापमान : 24.75° से.
कमाल तापमान : 26.24° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 58 %
वायू वेग : 6.52 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.24° से.
23.74°से. - 26.99°से.
रविवार, 12 जानेवारी कुछ बादल22.24°से. - 25.48°से.
सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल23.36°से. - 26.54°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.78°से. - 25.15°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.96°से. - 25.5°से.
गुरुवार, 16 जानेवारी टूटे हुए बादल24.28°से. - 26.06°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल– ऑलिव्ह रिडले कासव हे ओडिशातील व्हिलर बेटाचे वैभव,
भुवनेश्वर, (१० डिसेंबर) – ऑलिव्ह रिडले कासव हे ओडिशातील व्हिलर बेटाचे वैभव आहे. नोव्हेंबर ते मे हा रिडले कासवांचा घरटी बांधण्याचा काळ असतो. यावर्षी अंदाजे ५ लाख ऑलिव्ह रिडले कासवांनी या बेटावर घरटी केली आहेत. हे बेट म्हणजे डीआरडीओच्या क्षेपणास्त्र चाचणीचे हक्काचे ठिकाण आहे. मात्र, कासवांचे नुकसान नको म्हणून व्हिलर बेटावर डीआरडीओने पुढील तीन महिन्यांसाठी क्षेपणास्त्र चाचणी थांबवली आहे.
यंदा अंदाजे पाच लाख ऑलिव्ह रिडले कासवांनी येथे घरटी बांधली आहेत. क्षेपणास्त्र चाचणीदरम्यान प्रखर प्रकाश आणि कर्कश्श आवाजामुळे कासवांना समस्या उद्भवू नये म्हणून आम्ही क्षेपणास्त्र चाचणी कार्यक्रमांना या बेटावर स्थगिती दिली, असे डीआरडीओकडून सांगण्यात आले. ओडिशा सरकारने १ नोव्हेंबर २०२३ ते ३१ मे २०२४ दरम्यान कासव घरटी क्षेत्रात २० कि.मी. परिघात मासेमारीवर बंदी घातली आहे.