किमान तापमान : 25.41° से.
कमाल तापमान : 26.46° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 8.35 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.46° से.
23.58°से. - 26.99°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.33°से. - 27.04°से.
शनिवार, 25 जानेवारी टूटे हुए बादल25.05°से. - 27.61°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.42°से. - 28.19°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.65°से. - 27.75°से.
मंगळवार, 28 जानेवारी कुछ बादल25.13°से. - 26.87°से.
बुधवार, 29 जानेवारी घनघोर बादलनवी दिल्ली, २४ फेबुवारी – मागील सात वर्षांच्या काळात आपल्या सरकारने किमान हमीभावात ऐतिहासिक वाढ केली आहे. शेतकर्यांचे उत्पन्न दुपटीने वाढविण्यासाठी आवश्यक ते सर्वच प्रयत्न केले जात आहे आणि यासाठी आपले सरकार कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बुधवारी केले.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या स्थापनेला आज दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात मोदी बोलत होते. सिंचनाच्या दर्जेदार सुविधा, अद्ययावत तंत्रज्ञान, पीककर्ज, बाजारपेठ, पीकविमा कवच, जमिनीची निगा आणि मध्यस्थांना हटविणे, यासारख्या स्तरांवर सरकारने या काळात जे काही केले, ते आतापर्यंत पूर्वीच्या कोणत्याही सरकारने केले नव्हते, असे पंतप्रधान म्हणाले.
दोन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली होती. शेतकर्यांचे जीवनमान उंचावणे, जगात त्यांना प्रतिष्ठा मिळावी आणि देशवासीयांचे पोट भरण्यासाठी रात्रंदिवस कठोर परिश्रम घेणार्या लहान व अल्पभूधारक शेतकर्यांची भरभराट व्हावी, हाच या योजनेमागील मुख्य उद्देश आहे. केंद्रात रालोआचे सरकार येण्यापूर्वी शेतकर्यांना त्यांच्या मालावर अतिशय कमी हमीभाव मिळायचा. आता त्यात ऐतिहासिक वाढ झालेली आहे. शेतकर्यांचे उत्पन्न दुपटीने वाढविणे, यावरच सरकारने भर दिला आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी कृषी कायद्यांवरही मत मांडले. देशातील अतिशय कमी शेतकरी संघटना या कायद्यांच्या विरोधात आंदोलन करीत आहेत. बहुतांश शेतकरी संघटनांनी हे कायदे रद्द केले जाऊ नये, असा आग्रह केंद्र सरकारकडे केला आहे. लहान आणि अल्पभूधारक शेतकर्यांच्या हितासाठी हे कायदे असल्याची माहिती आंदोलनकर्त्या शेतकरी संघटनांनाही आहे. असे असतानाही ते केवळ स्वत:च्या स्वार्थासाठी आंदोलन करीत आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.