किमान तापमान : 25.97° से.
कमाल तापमान : 27.32° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 41 %
वायू वेग : 9.47 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.32° से.
23.58°से. - 27.99°से.
शुक्रवार, 24 जानेवारी घनघोर बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.47°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलचीनच्या माघारीनंतर नरमाईची भूमिका,
नवी दिल्ली, २५ फेब्रुवारी – चीनसारख्या बलाढ्य देशाला लडाखच्या सीमेवरून माघारी परतण्यास भारताने भाग पाडल्यानंतर आता पाकिस्तानही नरमला असून, या देशाने भारताकडे सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्व प्रकारच्या संघर्षविराम करारांचे काटेकोर पालन करण्याची तयारी दाखवली.
भारत आणि पाकिस्तानच्या लष्करी महासंचालनालयातील वरिष्ठ अधिकार्यांमध्ये या मुद्यावर हॉटलाईनवरून चर्चा झाली. या चर्चेत नियंत्रण रेषेवरील व इतर क्षेत्रातील संघर्षविरामाच्या सर्व करारांचे पालन करण्याचे मान्य केले. आज गुरुवारी याबाबतचे संयुक्त निवेदन जारी करण्यात आले. बुधवारी मध्यरात्रीपासून युद्धविराम बंदीबाबतचा निर्णय घेण्यात आला, असे यात म्हटले आहे.
हॉटलाईन संपर्क यंत्रणेच्या स्थापित तंत्रावर चर्चा केल्यानंतर, नियंत्रण रेषा आणि अन्य सर्व क्षेत्रात मुक्त, मोकळ्या आणि सौहार्दपूर्ण वातावरणासह संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. सीमेवर परस्पर फायदेशीर आणि स्थायी शांतता प्राप्त करण्यासाठी दोन्ही देशांच्या वरिष्ठ अधिकार्यांनी एकमेकांच्या मुख्य मुद्यांकडे आणि शांततेत अडथळा आणणार्या व हिंसाचाराला प्रवृत्त होणार्या समस्यांकडे लक्ष देण्यास सहमती दर्शविली.
२४ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून नियंत्रण रेषा आणि इतर सर्व क्षेत्रांमध्ये सर्व करार, समजूतदारपणा आणि संघर्षविराम याचे सक्तीने पालन करण्यास दोन्ही बाजूंनी सहमती दर्शविली, असे संयुक्त निवेदनात म्हटले आहे. हॉटलाईन संपर्क यंत्रणा आणि सीमा ध्वज बैठकीचा उपयोग कोणतीही परिस्थिती अथवा गैरसमज दूर करण्यासाठी केला जाईल, असेही संयुक्त निवेदनात सांगण्यात आले.
गेल्या तीन वर्षांत संघर्ष विरामाचे उल्लंघन करण्याच्या एकूण १०,७५२ घटना घडल्या, ज्यात ७२ जवान आणि ७० नागरिक ठार झाले, असे या महिन्याच्या सुरुवातीस लोकसभेत एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना केंद्रीय गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी सांगितले होते.