किमान तापमान : 26.15° से.
कमाल तापमान : 29.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 32 %
वायू वेग : 0.68 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.99° से.
23.43°से. - 29.99°से.
शनिवार, 25 जानेवारी छितरे हुए बादल24.93°से. - 27.39°से.
रविवार, 26 जानेवारी छितरे हुए बादल25.34°से. - 28.48°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.41°से. - 27.46°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.27°से. - 27.02°से.
बुधवार, 29 जानेवारी घनघोर बादल24.53°से. - 26.49°से.
गुरुवार, 30 जानेवारी टूटे हुए बादलभाजपा संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधानांचे आवाहन,
नवी दिल्ली, २७ जुलै – संसदेत गोंधळ घालत दोन्ही सभागृहात कामकाज होऊ न देणार्या कॉंग्रेसचा खरा चेहरा जनतेसमोर आणा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंगळवारी केले.
संसदभवनात आयोजित भाजपा संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी संसदेत गोंधळ घालणार्या कॉंग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांवर जोरदार हल्ला चढवला. सर्वपक्षीय बैठकीत कॉंग्रेस सहभागी झाली नाही, संसदेचे कामकाजही होऊ देत नाही. कोरोनावर बोलावलेल्या बैठकीत कॉंग्रेस स्वत: सहभागी झाली नाही व अन्य विरोधी पक्षांनाही सहभागी होऊ दिले नाही. सरकार सर्व मुद्यांवर चर्चेसाठी तयार आहे, पण कॉंग्रेस सभागृहाचे कामकाज होऊ देत नाही, कॉंग्रेसचा हा चेहरा लोकांसमोर आणा, असे आवाहन मोदी यांनी खासदारांना केले.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी समारंभात प्रत्येक खासदाराने आपला सहभाग द्यावा, तसेच देशातील कोणताही नागरिक या कार्यक्रमात सहभागी होण्यापासून सुटणार नाही, याची काळजी घ्यावी, असे ते म्हणाले. २०४७ मध्ये भारताच्या स्वातंत्र्याला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत, यानिमित्त येत्या २५ वर्षांत वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगतीचे कोणते मापदंड असले पाहिजे, याबाबत जनतेकडून सूचना मागवा, असे मोदी म्हणाले.
सांसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी तसेच राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी मागील आठवड्यात गोंधळामुळे संसदेत होऊ न शकलेल्या कामकाजाची माहिती दिली. या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथसिंह, गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री तसेच सर्व खासदार उपस्थित होते. संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी या बैठकीतील कामकाजाची नंतर माहिती दिली.