किमान तापमान : 25.53° से.
कमाल तापमान : 29.17° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 51 %
वायू वेग : 5.42 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.17° से.
23.36°से. - 30.99°से.
शनिवार, 25 जानेवारी कुछ बादल24.87°से. - 27.37°से.
रविवार, 26 जानेवारी घनघोर बादल25.32°से. - 28.26°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.31°से. - 27.61°से.
मंगळवार, 28 जानेवारी छितरे हुए बादल25.14°से. - 26.83°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादल24.73°से. - 26.84°से.
गुरुवार, 30 जानेवारी छितरे हुए बादलआता गोध्रासारख्या घटना घडणार नाही,
नवी दिल्ली, २६ जुलै – रेल्वे प्रवास सुरक्षित व्हावा आणि रेल्वेच्या डब्यांना लागणार्या आगींच्या घटना टळाव्या, यासाठी कपुरथळा येथील रेल्वे कोच फॅक्टरीने (आरसीएफ) नवीन आगविरोधी डबे विकसित केले आहे. देशातील सर्व रेल्वेगाड्यांना हे डबे बसविण्यात आल्यानंतर गोध्रासारख्या घटनांची पुनरावृत्ती टाळणे शक्य होणार आहे.
विकसित केलेल्या या आगविरोधी डब्यांची कामगिरी पाहिल्यानंतर मोठ्या प्रमाणात या तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल, असे आरसीएफचे महाव्यावस्थापक रवींदर गुप्ता यांनी सांगितले. रेल्वेच्या डब्यातील इलेक्ट्रिकल फिटिंग्जसाठी मिनिएचर सर्किट ब्रेकर (एमसीबी), दिवे, टर्मिनल बोड्र्स, कनेक्टरसारखी सुधारित उपकरणे वापरण्यात आली आहेत, असे त्यांनी सांगितले. हे रेल्वेचे डबे विकसित करण्यासाठी आगविरोधी साहित्य वापरण्यात आले आहे तसेच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी डब्यांमध्ये फायर एक्स्टिंग्युशर्सही बसवण्यात आले आहे, असे आरसीएफने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. कोणत्याही प्रकारच्या अपघातात प्रवासी सुरक्षित राहावेत यासाठी रेल्वेच्या डब्यांत या सुधारणा करण्यात आल्या आहेत.
धूर शोधणारी स्वयंचलित यंत्रणा, इलेक्ट्रिकल फिटिंग्जसाठी वापरण्यात आलेले सुधारित साहित्याचा आता वापर केला जात आहे. रेल्वेच्या डब्याची निर्मिती करताना आगरोधक साहित्याचा वापर करण्यात आला आहे तसेच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी डब्यात फायर एक्स्टिंग्युशर्सही बसवण्यात आले आहे, असे या निवेदनात म्हटले आहे.