किमान तापमान : 25.5° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 47 %
वायू वेग : 3.6 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
23.36°से. - 27.99°से.
शनिवार, 25 जानेवारी कुछ बादल24.99°से. - 27.65°से.
रविवार, 26 जानेवारी घनघोर बादल25.29°से. - 28.11°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.35°से. - 27.8°से.
मंगळवार, 28 जानेवारी कुछ बादल25.35°से. - 27.19°से.
बुधवार, 29 जानेवारी घनघोर बादल24.63°से. - 26.53°से.
गुरुवार, 30 जानेवारी छितरे हुए बादलशाह यांनी केली मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा,
गुवाहाटी/ऐझवाल, २६ जुलै – आसाम-मिझोरम सीमेवर आज सोमवारी हिंसाचार झाला असून, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी परस्परांचे पोलिस दल या हिंसाचारासाठी कारणीभूत असल्याचा दावा केला आहे. या प्रकरणात केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा, अशी मागणी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी केली. दरम्यान, या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा आणि मिझोरममधील त्यांचे समकक्ष झोरमथंगा यांच्यासोबत चर्चा केल्याचे वृत्त आहे.
बिस्व शर्मा आणि झोरमथंगा यांनी ट्विटरवर परस्परांवर आरोप केले. या हिंसाचाराबाबत झोरमथंगा यांच्यासोबत चर्चा केली असून, त्यांच्या पोलिस दलाने शांतता ठेवावी, असे ट्विट बिस्व शर्मा यांनी केले. आसामच्या पोलिसांनी बळाचा वापर करीत लाठीमार केला तसेच अश्रुधुराचे गोले डागले, असा आरोप झोरमथंगा यांनी केला. मात्र, मिझोरममधील समाजकंटकांनी दगडफेक करीत आसामच्या अधिकार्यांवर हल्ला केल्याचा आरोप आसामच्या पोलिस दलाने केला आहे.
आसामच्या बराक खोर्यातील काचर, करिमगंज आणि हैलाकांडी हे जिल्हे मिझोरमच्या आयझल, कोलासिब आणि ममित या तीन जिल्ह्यांसह १६४ किमी लांबीची सीमा या दोन्ही राज्यांमध्ये आहे. क्षेत्रीय मुद्याच्या वादावरून राज्यीय सीमेवर यापूर्वी ऑगस्ट २०२० आणि फेब्रुवारी महिन्यात संघर्ष झाला होता.
रविवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास एटलांग ओढ्याजवळ आठ अनधिकृत झोपड्या जाळण्यात आल्या, अशी माहिती मिझोरमचे पोलिस महानिरीक्षक लालबियाक्थंगा खियांगटे यांनी वृत्तसंस्थेला दिली. आसाममधील सर्वांत जवळील सीमाभागातल्या वैगगंटे येथील शेतकर्यांच्या या झोपड्या होत्या, असे त्यांनी सांगितले.
गोळीबारात आसामच्या सहा पोलिसांचा मृत्यू
काचर जिल्ह्यातील आंतरराज्यीय सीमेवर मिझोरमच्या हद्दीतील समाजकंटकांनी केलेल्या गोळीबारात आसाम पोलिस दलाच्या सहा कर्मचार्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा यांनी आज सोमवारी रात्री दिली. दोन्ही राज्यांमध्ये पेटलेल्या सीमावादात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हस्तक्षेप केला असून, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत त्यांनी चर्चा केली. मिझोरमच्या हद्दीतून करण्यात आलेल्या हल्ल्यांमध्ये जखमी झालेल्या ५० पोलिस कर्मचार्यांना सिलचर येथील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे. आसाम-मिझोरमच्या घटनात्मक सीमेचे संरक्षण करताना आसाम पोलिस दलातील सहा कर्मचारी हुतात्मा झाल्याची माहिती देताना दुःख होत आहे, असे ट्विट हेमंत बिस्व शर्मा यांनी केले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ईशान्येतील मुख्यमंत्र्यांसोबत बंदद्वार चर्चा केल्यानंतर दोन दिवसांनी आसाम-मिझोरममधील सीमावादाने हिंसक वळण घेतले आहे. सीमाभागात परस्परांवर गोळीबार केला जात असल्याचे आणि सरकारी वाहनांवर हल्ले चढवले जात असल्याचे वृत्त आहे.