किमान तापमान : 25.82° से.
कमाल तापमान : 25.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 2.16 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
25.99° से.
25.06°से. - 27.48°से.
शनिवार, 25 जानेवारी घनघोर बादल25.18°से. - 28.2°से.
रविवार, 26 जानेवारी टूटे हुए बादल25.1°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी छितरे हुए बादल25.16°से. - 26.7°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल24.78°से. - 26.75°से.
बुधवार, 29 जानेवारी कुछ बादल24.74°से. - 26.86°से.
गुरुवार, 30 जानेवारी घनघोर बादलनवी दिल्ली, २६ जुलै – स्वदेशी निर्मितीची पहिली विमानवाहक युद्धनौका आयएनएस विक्रांत लवकरच भारतीय नौदलात सामील होणार आहे. या युद्धनौकेची बेसिन चाचणी यशस्वी झाली आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही युद्धनौका खोल समुद्रात चाचणीसाठी उतरविण्यात येणार आहे.
या युद्धनौकेचे परीक्षण हिंदी महासागरात करण्यात येणार आहे. परीक्षण पूर्ण झाल्यानंतर ती चिनी समुद्राच्या सीमेजवळ तैनात करण्यात येणार आहे. चीनच्या कोणत्याही सागरी कुरापती हाणून पाडण्याची क्षमता या युद्धनौकेत आहे, अशी माहिती नौदलाच्या सूत्रांनी दिली.
स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित करण्यात आलेली ही पहिली महाकाय युद्धनौका आहे. रणभूमीवर तैनात करण्यापूर्वी औपचारिक परीक्षण करणे आवश्यक असून, त्या दिशेने तयारी सुरू झाली आहे. पुढील महिन्यात जेव्हा ही युद्धनौका खोल समुद्रात उतरवली जाईल, तेव्हा पूर्ण क्षमतेने तिचे परीक्षण केले जाणार आहे. यासाठी तीन ते सहा महिन्यांचा कालावधी लागू शकतो. योजनेनुसार ही युद्धनौका रणभूमीवर उतरविण्यासाठी तीन वर्षांचा विलंब झाला आहे. २०१८ मध्येच ही नौका भारतीय नौदलात सामील होणे अपेक्षित होते.
समुद्रातील चाचण्या पूर्ण झाल्यानंतर कोचिन शिपयार्डतर्फे ही युद्धनौका भारतीय नौदलाकडे सोपविण्यात येणार आहे. नौदलदेखील काही प्रमुख चाचण्या करणार आहे. त्यानंतर ही युद्धनौका चिनी समुद्र सीमेवर तैनात करण्यात येणार आहे. सर्वकाही अपेक्षेप्रमाणे घडले, तर २०२२ च्या मध्यापर्यंत ही युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात सामील करण्यात येणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.
सध्या भारताकडे केवळ आयएनएस विक्रमादित्य ही एकच विमानवाहू युद्धनौका आहे. ही युद्धनौका काही वर्षांपूर्वी रशियाकडून विकत घेण्यात आली होती. ती सध्या अरबी समुद्रात कारवारजवळ तैनात करण्यात आली आहे. आता आयएनएस विक्रांतला दक्षिण हिंद महासागरात तैनात केले जाणार असल्यामुळे चीनपासून असणार्या धोक्याचा सामना करणे शक्य होणार आहे.
आयएनएस विक्रांतची वैशिष्ट्ये
आयएनएस विक्रांत या महाकाय युद्धनौकेत ४० विमाने उड्डाण घेण्यासाठी सज्ज राहू शकतात. मिग-२९ सारखी २६ आधुनिक विमाने एकाच वेळी या युद्धनौकेवर तैनात केली जाऊ शकतात. तसेच दहा लहान हेलिकॉप्टर देखील याठिकाणी ठेवले जाऊ शकतात. आयएनएस विक्रांतची लांबी २६० मीटर इतकी आहे.