किमान तापमान : 26.91° से.
कमाल तापमान : 27.63° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 49 %
वायू वेग : 0.98 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.63° से.
25.22°से. - 27.99°से.
रविवार, 26 जानेवारी घनघोर बादल25.18°से. - 28.2°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.1°से. - 27.72°से.
मंगळवार, 28 जानेवारी छितरे हुए बादल24.99°से. - 26.7°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादल24.78°से. - 26.75°से.
गुरुवार, 30 जानेवारी कुछ बादल24.74°से. - 26.86°से.
शुक्रवार, 31 जानेवारी घनघोर बादलकारगिल विजय दिन,
श्रीनगर, २६ जुलै – १९९९ मधील पाकिस्तानविरुद्धच्या कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या भारतीय जवानांना लष्कराने सोमवारी लडाखमधील द्रास युद्ध स्मारकात श्रद्दांजली अर्पण केली. १९९९ मध्ये भारतीय सैन्य दलांनी पाकिस्तानचा कारगिलमध्ये सणसणीत पराभव करून अतिशय महत्त्वाच्या ‘टायगर हिल’वर कब्जा करून तेथे डौलात तिरंगा फडकावला. या विजयी क्षणाने अवघ्या भारतात आनंदाची आणि चैतन्याची प्रचंड लाट उसळली. या ऐतिहासिक युद्ध मोहिमेला ‘ऑपरेशन विजय’ हे नाव देण्यात आले.
भारतीय सेनादलांचे धाडस, शौर्य आणि त्यांच्या पराक्रमाच्या स्मृती आज सोमवारी कारगिल विजय दिनाच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त जागविण्यात आल्या, अशी माहिती श्रीनगर संरक्षण विभागाचे जनसंपर्क अधिकारी कर्नल इमरोन मुसावी यांनी सांगितले.
हा विजय सोहळा कारगिल युद्ध स्मारक, द्रास येथे आयोजित करण्यात आला होता. लडाखचे नायब राज्यपाल आर. के. माथूर या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी संपूर्ण स्मारकाला पुष्पमाला अर्पण करून संपूर्ण देशाच्या वतीने हुतात्मा जवानांना अभिवादन केले. जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद द्रास स्मारकाला भेट देणार होते, पण खराब हवामानामुळे त्यांना आपल्या नियोजित कार्यक्रमात बदल करावा लागला. त्याऐवजी त्यांनी उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला युद्ध स्मारकाला भेट देऊन पुष्पहार अर्पण केला.
कर्नल इमरोन मुसावी म्हणाले की, यावर्षी कारगिल विजय दिवस व ‘स्वर्णिम विजय वर्ष विजय ज्वाला’ यांचा अपूर्व संगम आहे. १९७१ च्या बांगलादेश मुक्ती संग्रामात भारताने पाकिस्तानचा निर्णायक पराभव केला होता. त्यालाही यंदा ५० वर्षे पूर्ण होणार आहेत.
कारगिल युद्ध स्मारकावर आयोजित सोहळ्याचे उद्घाटन जीओसी-इन-सी नॉर्दन कमांडचे लेफ्टनंट जनरल वाय. के. जोशी, लेफ्टनंट जनरल पीजीके मेनन यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. तीनही सशस्त्र दलांचे सेनापती जनरल बिपीन रावत यांच्या वतीने रवाना झालेल्या स्वर्णिम विजय वर्ष विजयी ज्योतीचे स्वागत मान्यवारांच्या उपस्थितीत करण्यात आले. लेफ्टनंट जनरल डी. पी. पांडे, लेफ्टनंट जनरल एम. व्ही. सुचिंद्रकुमार आणि इतर सैन्य अधिकारी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.