किमान तापमान : 25.99° से.
कमाल तापमान : 29.99° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 55 %
वायू वेग : 8.13 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.99° से.
25.07°से. - 31.99°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.57°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश24.99°से. - 27.22°से.
बुधवार, 29 जानेवारी घनघोर बादल24.59°से. - 26.52°से.
गुरुवार, 30 जानेवारी टूटे हुए बादल24.54°से. - 26.62°से.
शुक्रवार, 31 जानेवारी घनघोर बादल23.37°से. - 24.49°से.
शनिवार, 01 फेब्रुवारी साफ आकाशतिसर्या टप्प्यातील चाचणी पूर्ण,
नवी दिल्ली, २६ जुलै – सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस कोर्बेव्हॅक्स लस येईल, अशी अपेक्षा बायोलॉजिकल-ई या हैदराबाद येथील कंपनीला असल्याची माहिती सूत्रांनी आज सोमवारी दिली.
बायोलॉजिकल-ईने विकसित केलेली ही आरबीडी प्रथिन आधारित लस असून, पहिल्या दोन चाचण्यांमध्ये उत्साहवर्धक यश मिळाल्यानंतर या लसीची नुकतीच तिसरी चाचणी घेण्यात आली आहे.
देशातील नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी तसेच त्यांना परवडणारी लस उपलब्ध व्हावी यासाठी केंद्र सरकारने या लसीच्या वैद्यकीयपूर्व ते तीन टप्प्यांतील चाचणीसाठी बायोलॉजिकल-ई कंपनीला मदत केली आहे. ‘मिशन कोविड सुरक्षा’अंतर्गत केंद्र सरकार पाच ते सहा लस उत्पादकांना मदत करीत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
बायोलॉजिकल-ई कंपनीला वैद्यकीयपूर्व टप्प्यापासून ते तिसर्या टप्प्यापर्यंतच्या चाचणीसाठी केंद्र सरकारकडून मदत मिळाली आहे. केंद्र सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाने कंपनीला केवळ १०० कोटी रुपयांची आर्थिक मदतच नव्हे, तर रिसर्च इन्स्टिट्यूशनल हेल्थ सायन्सेस टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून कंपनीसोबत भागीदारी देखील केलीआहे, असे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
३९ हजार नव्या बाधितांची भर
देशात मागील चोवीस तासांत ३९ हजार नव्या कोरोनाबाधितांची भर पडली असून, ४१६ लोकांचा मृत्यू झाला आहे. रविवारच्या तुलनेत कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज सोमवारी याविषयीची माहिती जाहीर केली.
ऋ ३९,३६१ नव्या बाधितांमुळे देशभरातील एकूण संक्रमितांची संख्या ३.१४ कोटींवर गेली आहे.
ऋ ३८ हजार बाधितांनी कोरोनावर मात केल्याने, बरे झालेल्यांची एकूण संख्या ३ कोटी ५ लाख ७९ हजारांवर गेली आहे. हे प्रमाण ९७.३५ टक्के आहे.
ऋ ४१६ जणांचा मृत्यू झाल्याने, देशातील एकूण कोरोनाबळींचा आकडा ४.२१ लाखांच्या घरात गेला आहे.
ऋ देशभरात सध्या ४.११ लाख सक्रिय बाधित असून, हे प्रमाण आणखी वाढत १.३१ टक्क्यांवर गेले आहे.
ऋ रविवारी एकाच दिवशी ११.५४ लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्याने, आतापर्यंतच्या चाचण्यांची संख्या ४५.७४ कोटींवर गेली असून, देशव्यापी लसीकरण मोहिमेत ४३.५१ कोटी नागरिकांनी लस घेतली आहे.