किमान तापमान : 24.99° से.
कमाल तापमान : 25.79° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 47 %
वायू वेग : 5.84 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
24.11°से. - 25.77°से.
शुक्रवार, 24 जानेवारी छितरे हुए बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.47°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलकोरोना राजकारणाचा नाही, मानवतेचा मुद्दा, पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन,
नवी दिल्ली, २० जुलै – संपूर्ण मानव जाती कोरोनाच्या संकटाचा सामना करीत असतानाच्या काळात विरोधी पक्षांची वागणूक बेजबाबदारपणाची असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंगळवारी केला. कोरोना हा राजकारणाचा नाही, तर मानवतेचा मुद्दा असल्याचे ते म्हणाले.
संसदभवन परिसरात आयोजित भाजपा संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधान मोदी बोलत होते. कोरोनामुळे प्रदीर्घ काळानंतर आज भाजपा संसदीय पक्षाची बैठक झाली. या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथसिंह, गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह अनेक मंत्री आणि खासदार उपस्थित होते. संसदेत गोंधळ घालण्याच्या आणि सभागृहाच्या कामकाजात अडथळा आणण्याच्या विरोधी पक्षांच्या कृत्याबद्दल मोदी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सत्तेवर राहण्याचा अधिकार आपलाच आहे, या मानसिकतेतून कॉंग्रेस अद्यापही बाहेर आली नाही, असे मोदी म्हणाले. सभागृहात चर्चा व्हावी, सार्थक चर्चा व्हावी, यासाठी विरोधी सदस्यांनी सभागृहाच्या कामकाजात सहभागी व्हावे, अशी इच्छा पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली.
गेल्या दोन वर्षापासून जग कोरोनाशी झुंजत आहे, संपूर्ण मानव जाती यामुळे प्रभावित झाली. या विषयावर चर्चेसाठी सरकार तयार आहे, पण विरोधी पक्षांची विशेषत: कॉंग्रेसची भूमिका अतिशय बेजबाबदारपणाची आहे. कोरोनाच्या महाभयंकर साथीतही देशातील एका व्यक्तीला सरकारने उपाशी झोपू दिले नाही, याकडे मोदी यांनी लक्ष वेधले. कोरोना काळातील सरकारची कामगिरी जनतेपयर्र्त पोहोचवण्याचे आवाहन मोदी यांनी यावेळी केले.
कोरोना लसीकरणाबाबत जनजागृती करण्याचे तसेच केंद्र सरकारच्या गरीब कल्याण योजनेचा लाभ प्रत्येकाला मिळतो की नाही, याबाबत सतर्क राहण्याचे आवाहन मोदी यांनी खासदारांना केले. कोरोना हा राजकारणाचा नाही, तर मानवतेचा मुद्दा असल्याचे ते म्हणाले. कोरोना हाताळणीबाबात तसेच लसीकरणाबाबाबत विरोधी पक्ष करत असलेला अपप्रचार हाणून पाडण्याचे आवाहन करताना मोदी म्हणाले की, खासदारांनी प्रभावी पद्धतीने हा अपप्रचार मुद्देसूद खोडून काढला पाहिजे. तिसर्या लाटेच्या संभाव्य शक्यतेमुळे सावध राहण्याचे तसेच आवश्यक त्या उपाययोजना आपल्या मतदारसंघात करण्याचे आवाहन मोदी यांनी खासदारांना केले. या बैठकीत झालेल्या कामकाजाजी माहिती संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी नंतर पत्रकारांना दिली.