किमान तापमान : 24.59° से.
कमाल तापमान : 25.79° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 50 %
वायू वेग : 5.84 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.59° से.
23.83°से. - 25.97°से.
शुक्रवार, 24 जानेवारी छितरे हुए बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.47°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलभय्याजी जोशी यांचे प्रतिपादन,
नवी दिल्ली, २० जुलै – भारताची विश्वगुरू ही संकल्पना सत्ता केंद्रित नसून, विश्वबंधुत्त्वावर आधारित आहे. संत ज्ञानेश्वरांनी सर्वप्रथम विश्वाचे आर्त माझे मनी प्रकाशले असे सांगितले आहे. त्यामुळे भारतीय जीवनदृष्टीतील वैश्विकता समजून घेण्यासाठी ज्ञानेश्वर आणि त्यांचे पसायदान समजावून घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य सुरेश उपाख्य भय्याजी जोशी यांनी केले. दिल्लीत आयोजित पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते.
इंदिरा गांधी कला केंद्रात आयोजित समारंभात गोविंदगिरी महाराज, कला केंद्राचे अध्यक्ष रामबहादूर राय, सचिव डॉ. सच्चिदानंद जोशी, माजी खासदार आर. के. सिन्हा, हिंदुस्थान समाचारचे कार्याध्यक्ष अरविंद मार्डीकर आणि संघाचे अ. भा. प्रचारप्रमुख सुनील आंबेकर प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी भय्याजी जोशी लिखित ‘ज्ञानेश्वरी प्रसाद’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी लेखक म्हणून आपले मनोगत मांडताना भय्याजी जोशी यांनी सांगितले की, ‘विश्वाचे आर्त माझे मनी प्रकाशले, अवघे चि जालें देहब्रह्म’ असे ज्ञानेश्वर माउलींनी म्हटले आहे. यातून ज्ञानेश्वरांची माणसाबद्दलची आस्था, जीवनदृष्टी आणि जगण्याचे प्रयोजन हे सारे स्पष्ट होते. असेच पसायदानाच्या बाबतीतही आहे. पसायदानात कुठलाच किंतु, परंतु मनात न ठेवता किंवा हातचे न राखता, ते जे पसायदान सांगतात ते इतके भव्यदिव्य असते की सर्व विश्वच त्यांनी कवेत घेतल्यासारखे वाटते. ज्ञानेश्वरांच्या अध्यात्मात प्रतिपादित व्यापक वैश्विक दृष्टी भारतीय संस्कृतीत निहीत आहे. भारताच्या विश्वगुरू या संकल्पनेबाबत काहींच्या मनात वैचारिक गोंधळ उडालेला दिसतो. अशा वेळी ज्ञानेश्वरांनी प्रतिपादित केलेली विश्वदृष्टी आणि पसायदान समजून घेतल्यास भारतीय तत्त्वज्ञानातील विश्वगुरू म्हणजे सत्ताकेंद्रीत अधिराज्य नव्हे, तर विश्वबंधुत्त्व आहे, हे समजण्यास मदत मिळेल, असा विश्वास भय्याजी जोशी यांनी यावेळी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे मुख्य अतिथी गोविंदगिरी महाराज म्हणाले की, ज्ञानेश्वर हे केवळ श्रेष्ठसंत नव्हते, तर तत्त्वज्ञान शिरोमणी देखील होते. आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला ज्ञानेश्वरी प्रसाद ग्रंथाचे प्रकाशन होणे, हा दैवी योग आहे. ज्ञानेश्वरी हा ज्ञानाचा महासागर असून, त्यातून नेमके काय आणि कसे आत्मसात करायचे, या प्रश्नांची उकल करण्यासाठी ज्ञानेश्वरी प्रसाद या ग्रंथाचे वाचन करणे क्रमप्राप्त ठरते. कार्यक्रमाचे अध्यक्ष रामबहादूर राय म्हणाले की, आजघडीला जगात विविध ठिकाणी गीतेवर सखोल अध्ययन आणि चिंतन सुरू आहे. गीतेतील तत्त्वज्ञानाकडे कसे बघावे आणि काय आत्मसात करावे, याचा बोध घेण्याची दृष्टी ज्ञानेश्वरी प्रसादच्या वाचनातून मिळते. या पुस्तकात भक्ती, कर्म आणि ज्ञानाचा समन्वय असल्यामुळे हा ग्रंथ आगळा-वेगळा आहे. याप्रसंगी ज्ञानेश्वर मुळे, डॉ. सच्चिदानंद जोशी आणि इतर मान्यवरांनी समयोचित आणि विषयानुरूप मनोगत व्यक्त केले.