किमान तापमान : 25.97° से.
कमाल तापमान : 27.32° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 41 %
वायू वेग : 9.47 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.32° से.
23.58°से. - 27.99°से.
शुक्रवार, 24 जानेवारी घनघोर बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.47°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलगुप्तचर यंत्रणांचा इशारा,
नवी दिल्ली, २० जुलै – स्वातंत्र्यदिनाला दहशतवादी ‘ड्रोन जिहाद’च्या माध्यमातून दिल्लीत घातपात घडवू शकतात, असा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. त्यानंतर सुरक्षा यंत्रणा सजग झाल्या आहेत.
सध्या संसदेचे सुरू असलेले पावसाळी अधिवेशन ते १५ ऑगस्ट या कालावधीसाठी दिल्ली पोलिसांना हा इशारा देण्यात आला आहे. ५ ऑगस्टला दिल्ली हादरवून सोडण्याचा कट काही दहशतवादी संघटनांनी रचला आहे आणि पाकिस्तानातील अतिरेकी दिल्लीवर हल्ला घडवू शकतात, असे गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या इशार्यात म्हटले आहे.
जम्मू-काश्मीरला विशेषाधिकार देणारे ३७० कलम ५ ऑगस्ट २०१९ रोजी निष्प्रभ करण्यात आले होते. त्यामुळे दहशतवादी संघटना त्याच तारखेला दिल्लीवर हल्ला करू शकतात, असा इशारा सुरक्षा यंत्रणांनी दिल्ली पोलिसांना दिला आहे. ड्रोन जिहादच्या विरोधात लढण्यासाठी दिल्ली पोलिस आणि इतर सुरक्षा दलांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. या व्यतिरिक्त दहशतवादी हल्ला परतवण्याचे आवश्यक ते प्रशिक्षणही देण्यात आले आहे.