किमान तापमान : 24.99° से.
कमाल तापमान : 25.79° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 47 %
वायू वेग : 5.84 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
24.11°से. - 25.77°से.
शुक्रवार, 24 जानेवारी छितरे हुए बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.47°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलकामकाज स्थगित,
नवी दिल्ली, २० जुलै – पेगासस टेलिफोन टॅपिंग तसेच अन्य प्रकरणांवरून संसदेच्या दोन्ही सभागृहात आज मंगळवारीही गदारोळ झाला. यामुळे लोकसभेचे कामकाज आधी दोनदा आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. राज्यसभेचे कामकाजही तीनदा स्थगित करावे लागले.
आज सकाळी ११ वाजता लोकसभेच्या कामकाजाला प्रारंभ होताच गोंधळाला सुरुवात झाली. कॉंग्रेस आणि विरोधी पक्षांचे सदस्य पोस्टर्स घेऊन वेलमध्ये उतरत घोषणाबाजी करू लागले. सदस्यांनी शांत राहण्याचे आणि आपल्या जागेवर जाण्याचे आवाहन सभापती ओम बिर्ला करत होते, पण त्याला सदस्य प्रतिसाद देत नव्हते. सभागृहात पोस्टर्स फडकवणे सभागृहाच्या नियम आणि प्रक्रियेच्या विरोधात आहे, या शब्दात विरोधी सदस्यांना खडसावत बिर्ला म्हणाले की, तुम्ही नियमानुसार नोटिस देत असाल, तर सर्व मुद्यांवर चर्चा करायची सरकारची तयारी आहे. मात्र, तुम्ही चुकीच्या परंपरा टाकत आहात. सभागृहाचे कामकाज सुरळीत होऊ देण्यासाठी नियम आणि प्रक्रिया यांचे पालन करण्याचे आवाहन बिर्ला यांनी गोंधळ घालणार्या सदस्यांना केले. मात्र सभागृहातील गोंधळ शांत होत नसल्यामुळे त्यांनी कामकाज दुपारी दोनपर्यंत स्थगित केले.
दुपारी दोन वाजता कामकाज पुन्हा सुरू होताच पुन्हा गोंधळ सुरू झाला. त्यामुळे कामकाज दुपारी तीन वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी स्थगत करण्यात आले.
राज्यसभेचे कामकाज तीनदा स्थगित
राज्यसभेच्या कामकाजाला सकाळी ११ वाजता प्रारंभ होताच टेलिफोन टॅपिंग प्रकरणावरून विरोधी पक्षाचे सदस्य घोषणा देत वेलमध्ये आले. त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. पेगासास हा राष्ट्रीय सुरक्षेचा गंभीर मुद्दा असल्यामुळे यावर तत्काळ चर्चा घेतली पाहिजे, अशी मागणी कॉंग्रेसचे आनंद शर्मा यांनी केली. सभागृहातील सर्व कामकाज थांबवून या मुद्यावर चर्चा करण्यासाठी त्यांनी नियम २६७ ची नोटिसही दिली. या विषयाचे गांभीर्य मी समजतो, हा राष्ट्रहिताशी संबंधित मुद्दा आहे, पण या नोटिसीवर आपण योग्यवेळी निर्णय देऊ, असे व्यंकय्या नायडू म्हणाले. नायडू यांच्या या उत्तरानंतर सभागृहात गोंधळ सुरू झाला. सभागृहात शून्य तासाचे कामकाज होऊ देण्याचे आवाहन नायडू करत होते. मात्र, सभागृहातील गोंधळ शांत होत नसल्यामुळे सभागृहाचे कामकाजचालू नये, असे काही जणांना वाटते, असे सांगत नायडू यांनी सभागृहाचे कामकाज दुपारी बारापर्यंत स्थगित केले.
जेपीसी चौकशीची कॉंग्रेसची मागणी
पेगासस टेलिफोन टॅपिंग प्रकरणाची संयुक्त संसदीय समिती (जेपीसी)मार्फत चौकशी करण्याची मागणी कॉंग्रेसने केली आहे.
पेगासस टेलिफोन टॅपिंग प्रकरणी कॉंग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. या मुद्यावरून पावसाळी अधिवेशनात संसदेच्या दोन्ही सभागृहात कॉंग्रेस आक्रमक पावित्र्यात आहे. या मुद्यावर तातडीने चर्चा करण्यासाठी कॉंग्रेसतर्फे दोन्ही सभागृहात स्थगनप्रस्तावाची सूचनाही देण्यात आली आहे.
या मुद्यावर आपली व्यूहरचना ठरवण्यासाठी कॉंग्रेसतर्फे आज सकाळी विविध विरोधी पक्षनेत्यांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना कॉंग्रेस प्रवक्ते शक्तिसिंह गोहिल म्हणाले की, पेगासस सॉफ्टवेअरची खरेदी केली की नाही, हे सरकारने आधी स्पष्ट करावे. हेरगिरी आणि टेलिफोन टॅपिंग प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याची कॉंग्रेस पक्षाची मागणी आहे.