किमान तापमान : 24.99° से.
कमाल तापमान : 25.79° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 47 %
वायू वेग : 5.84 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
24.11°से. - 25.77°से.
शुक्रवार, 24 जानेवारी छितरे हुए बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.47°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलनवी दिल्ली, १८ जुलै – संसदीय नियम आणि प्रक्रियेनुसार कोणत्याही विषयावर संसदेत चर्चा करायला सरकार तयार आहे, पण ही चर्चा निकोप आणि सार्थक असली पाहिजे, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी दिली.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून प्रारंभ होत आहे, त्या पृष्ठभूमीवर आज सरकारने सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत मोदी बोलत होते. लोकप्रतिनिधींच्या विशेषत: विरोधी पक्षांच्या लोकप्रतिनिधीच्या सूचना महत्त्वपूर्ण असतात, कारण ते लोकांमधून आलेले असतात, त्यामुळे त्यांनी सभागृहातील चर्चेतून त्या मांडल्या पाहिजे, असे आवाहन मोदी यांनी केले.
या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथसिंह, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी, उद्योग आणि वाणिज्य मंत्री तसेच राज्यसभेतील सत्तापक्षाचे नेते पीयूष गोयल, विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खडगे, लोकसभेतील कॉंग्रेसपक्षाचे गटनेते अधीररंजन चौधरी, द्रमुकचे तिरुची सिवा, तृणमूल कॉंग्रेसचे डेरेक ओ ब्रायन, सपाचे रामगोपाल यादव, बसपाचे सतीशचंद्र मिश्रा यांच्यासह विविध पक्षांचे नेते उपस्थित होते. केंद्रीय मंत्री तसेच अपना दलाच्या अनुप्रिया पटेल तसेच लोजपाचे पशुपतीकुमार पारसही या बैठकीला उपस्थित होते. बैठकीनंतर बैठकीतील कामकाजाची माहिती प्रल्हाद जोशी यांनी नंतर पत्रकारांना दिली. ३३ पक्षांचे ४० नेते या बैठकीला उपस्थित होते. आधी विविध पक्षांतील नेत्यांनी अधिवेशनात कोणकोणत्या मुद्यांवर चर्चा झाली पाहिजे, याविषयी सूचना केल्या, नंतर पंतप्रधान मोदी यांनी बैठकीला संबोधित केले, असे ते म्हणाले.
संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सरकारला घेरण्याची विरोधकांची रणनीती
विविध मुद्यांवर ठरणार वादळी
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला उद्या सोमवारपासून प्रारंभ होत आहे. या अधिवेशनात कोरोना लसीच्या वाटपातील भेदभाव तसेच लसीकरणातील दिरंगाई, महागाई, पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीच्या मुद्यावरून सरकारला घेरण्याची तयारी विरोधी पक्षांनी केली आहे.
कोरोना निर्बंधाच्या काळात होत असलेले हे अधिवेशन १३ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या काळात दोन्ही सभागृहांच्या १९ बैठका होणार आहेत. या दरम्यान सरकार १७ विधेयके सादर करणार आहे. यापैकी तीन विधेयके नुकत्याच जारी करण्यात आलेल्या अध्यादेशांची आहेत. संसद अधिवेशन सुरू नसताना महत्त्वाच्या मुद्यांवर सरकार अध्यादेश काढू शकते. मात्र, अधिवेशन सुरू झाल्यानंतर ४२ दिवसांत या अध्यादेशांचे विधेयकाच्या स्वरूपात दोन्ही सभागृहात कायद्यात रूपांतर करून घ्यावे लागते.
लोकसभा तसेच राज्यसभेचे कामकाज सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळात होणार आहे. या अधिवेशनात कोरोना लसीच्या वाटपातील भेदभाव तसेच लसीकरणातील दिरंगाई, शेतकरी आंदोलन, वाढती महागाई, पेट्रोल आणि डिझेलच्या तसेच स्वयंपाकाच्या गॅसच्या वाढत्या किमतीच्या मुद्यावरून सरकारला घेरण्याची तयारी विरोधी पक्षांनी केली आहे.
पंतप्रधान मोदी उद्या सोमवारी दोन्ही सभागृहात आपल्या नवीन मंत्र्यांचा परिचय करून देतील. ७ जुलैला मोदी यांनी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला असून, त्यात ३६ नव्या चेहर्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. त्यानंतर होत असलेले संसदेचे हे पहिलेच अधिवेशन असल्यामुळे दोन्ही सभागृहात नवीन मंत्र्यांचा परिचय करून देण्यात येईल.