किमान तापमान : 24.99° से.
कमाल तापमान : 25.79° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 47 %
वायू वेग : 5.84 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
24.11°से. - 25.77°से.
शुक्रवार, 24 जानेवारी छितरे हुए बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.47°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलनवी दिल्ली, १९ जुलै – भारताची मजबूत पायाभूत सुविधा आणि प्रचंड मोठी बाजारपेठ यामुळे हा देश विदेशी गुंतवणूकदारांचे आकर्षण केंद्र बनला असून, या बळावर भारतात विदेशी गुंतवणुकीचा प्रवाह कायमस्वरूपी सुरूच राहणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी आज सोमवारी लोकसभेत केले.
सीतारामन् यांनी यावेळी जागतिक गुंतवणूक अहवालाचा संदर्भ दिला. २०२० मध्ये विदेशी गुंतवणुकीत २५.४ टक्क्यांची वाढ झाली होती. या काळात देशात एकूण ६४ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक भारतात आली. २०१९ मध्ये ती ५१ अब्ज डॉलर्स इतकी होती. २०२० या वर्षात भारत हा विदेशी गुंतवणूक प्राप्त करणारा जगातील पाचव्या क्रमांकाचा देश ठरला होता. त्यापूर्वीच्या वर्षात भारताचे स्थान आठव्या क्रमांकावर होते, असे सीतारामन् यांनी सांगितले.
तथापि, मागील वर्षी घोषित करण्यात आलेल्या देशातील हरित प्रकल्पांमध्ये गुंतवणूक १९ टक्क्यांनी कमी झाल्याचे दिसून आले, याकडे त्यांनी लक्ष वेधले. मात्र, इतर विकसनशील देशांच्या तुलनेत हे प्रमाण बरेच कमी आहे. इतर देशांमध्ये याच काळात ही गुंतवणूक ४४ टक्क्यांनी कमी झाली होती, असे अर्थमंत्री म्हणाल्या.
विदेशी गुंतवणुकीच्या क्षेत्रात मात्र भारत नेहमीच आकर्षण केंंद्र राहणार आहे. भारतातील पायाभूत सुविधा अतिशय मजबूत आहेत आणि व्यापक बाजारपेठही येथेच आहे. अशा स्थितीत विदेशी गुंतवणूकदारांना भारताचे आकर्षण राहाणे स्वाभाविक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.