किमान तापमान : 25.5° से.
कमाल तापमान : 27.83° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 47 %
वायू वेग : 9.86 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.83° से.
23.58°से. - 28.99°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.33°से. - 27.04°से.
शनिवार, 25 जानेवारी टूटे हुए बादल25.05°से. - 27.61°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.42°से. - 28.19°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.65°से. - 27.75°से.
मंगळवार, 28 जानेवारी कुछ बादल25.13°से. - 26.87°से.
बुधवार, 29 जानेवारी घनघोर बादलनवी दिल्ली, १९ जुलै – पेगासस टेलिफोन टॅपिंग विवादावरून आज लोकसभेत गदारोळ झाला, या मुद्यावरून विरोधी पक्ष आक्रमक होते. पावसाळी अधिवेशनाच्या एकदिवस आधी काही वृत्तपत्रात याबाबतच्या बातम्या येणे, हा निश्चितच योगायोग नाही, असे प्रत्युत्तर सरकारतर्फे देण्यात आले.
रविवारी रात्री एका वेबपोर्टलवर अतिशय खळबळजनक बातमी चालवण्यात आली. या बातमीतून अनेक आरोप करण्यात आले, मात्र हा निश्चितच योगायोग नाही, असे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत एका लेखी निवेदनातून स्पष्ट केले.
आमचे कायदे आणि देशात मजबूत सुरक्षा संस्था असताना चौकशी आणि संतुलन साधताना कोणत्याही प्रकारची अवैध हेरगिरी अशक्य आहे. भारतात एक स्थापित प्रक्रिया आहे, ज्याच्या माध्यमातून राष्ट्रीय सुरक्षेच्या संदर्भात इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वैध मार्गाने वापर केला जातो, असे वैष्णव म्हणाले.
या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी खासदारांनी केली आहे, त्याचे मला आश्चर्य वाटत नाही, कारण टेलिफोन टॅपिंगबाबतचा सविस्तर अहवाल खासदारांच्या वाचनात आला नाही. त्यामुळे खासदारांनी तथ्य आणि तर्काच्या आधारावर अशी मागणी करायला पाहिजे. या अहवालाचा आधार एक कन्सोर्शियम आहे, ज्यांना ५० हजार टेलिफोन क्रमांकाबाबत फुटलेली अर्धवट माहिती मिळाली आहे, असे त्यांनी निवेदनात स्पष्ट केले.
याआधीही पेगाससच्या वापरावरून अशाच प्रकारचे दावे करण्यात आले होते. मात्र, त्यासंदर्भातील अहवालात कोणत्याही प्रकारची तथ्यात्मक सत्यता नव्हती, याकडे लक्ष वेधत वैष्णव म्हणाले की, सर्वोच्च न्यायालय तसेच अन्य संस्थांनीही याचा स्पष्टपणे इन्कार केला होता. त्यामुळे १८ जुलैचा अहवाल हा भारतातील लोकशाही तसेच त्याद्वारे स्थापित घटनात्मक संस्थांना बदनाम करण्याचे कारस्थान दिसते. इस्त्रायलच्या पेगासस या सॉफ्टवेअरचा वापर करत भारतात अनेक राजकीय नेते, पत्रकार तसेच सार्वजनिक जीवनात वावरणार्या लोकांचे टेलिफोन हॅक करण्यात आल्याचा आरोप या वेबपोर्टलने केला होता. याचे सरकारने लगोलग खंडनही केले होते. भारत हा लोकशाही मानणारा देश आहे, या देशात गोपनीयतेचा अधिकार हा मौलिक अधिकार आहे, त्यामुळे याबाबतचे वृत्त खोडसाळ आहे, असे सरकारने म्हटले आहे. टेलिफोन टॅपिंगबाबतच्या कायदेशीर प्रक्रियेचा तपशीलही त्यांनी यावेळी दिला. पेगासस सॉफ्टवेअर तयार करणारी इस्त्रायली कंपनी एनएसओनेही हा कथित अहवाल म्हणजे रद्दीचा तुकडा असल्याचे म्हटले आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.