|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 7:02 ए एम | सूर्यास्त : 6:18 पी एम
हवामान

किमान तापमान : 24.99° से.

कमाल तापमान : 25.79° से.

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 47 %

वायू वेग : 5.84 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

24.99° से.

हवामानाचा अंदाज

24.11°से. - 25.77°से.

शुक्रवार, 24 जानेवारी छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.33°से. - 26.99°से.

शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.01°से. - 27.57°से.

रविवार, 26 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.47°से. - 27.72°से.

सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

25.66°से. - 27.64°से.

मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.05°से. - 27.04°से.

बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादल
Home » राष्ट्रीय, संसद » विरोधकांची मानसिकता दलितविरोधी

विरोधकांची मानसिकता दलितविरोधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संसदेत हल्लाबोल,
नवी दिल्ली, १९ जुलै – पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहात आज सोमवारी गोंधळ झाला, त्यामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज स्थगित करावे लागले. या गोंधळामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या मंत्र्यांचा परिचय सभागृहाला करून देता आला नाही. दलित, महिला, ओबीसी, शेतकरी, आदिवासी केंद्रात मंत्री झाल्याचे विरोधकांना पाहावले नाही. विरोधकांची मानसिकता महिला व दलितविरोधी आहे, असा संताप पंतप्रधानांनी व्यक्त केला.
सभागृहाच्या कामकाजाला प्रारंभ होताच नवीन सदस्यांचा शपथविधी झाला. त्यानंतर पंतप्रधान मोदी नवीन मंत्र्याचा परिचय करून द्यायला उभे झाले. याचवेळी कॉंग्रेस आणि अन्य विरोधी सदस्यांनी गोंधळाला सुरुवात केली. मला वाटले, आज सभागृहात उत्साहाचे वातावरण असेल, कारण मोठ्या संख्येत महिला, दलित, ओबीसी, आदिवासी आणि शेतकरी कुटुंबातील सदस्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली. या सर्वांचा परिचय करताना मला आनंद होत आहे. मात्र सभागृहातील गोंधळाचे वातावरण पाहून असे वाटते की, महिला, दलित, ओबीसी, आदिवासी यांना मंत्री केलेले पाहून काही जणांना वेदना होत आहे. त्यामुळे विरोधी बाजूचे लोक नवीन मंत्र्याचा परिचय होऊ देत नाही, असे पंतप्रधान म्हणाले. मंत्र्यांचा परिचय करून देणे अशक्य झाल्यामुळे मोदी यांनी मंत्र्यांच्या नावाची यादी सभागृहाच्या पटलावर ठेवली.
गोंधळ घालणार्‍या सदस्यांना शांत होण्याचे आणि आपल्या जागेवर जाण्याचे आवाहन सभापती ओम बिर्ला वारंवार करीत होते, पण त्याला विरोधी सदस्यांकडून प्रतिसाद मिळत नव्हता. संसदीय परंपरा तोडू नका, तुम्ही दीर्घकाळ सत्तेवर होता, त्यामुळे संसदीय परंपरा तोडून सभागृहाची प्रतिष्ठा कमी करू नका, असे बिर्ला म्हणाले. पंतप्रधान सभागृहाचे नेते आहे, ते आपल्या नव्या मंत्र्यांचा परिचय करून देत आहेत, त्यामुळे तुम्ही सभागृहाची मर्यादा कायम राखा, असे आवाहन बिर्ला यांनी केले. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनीही गोंधळ घालणार्‍या सदस्यांना शांत राहण्याचे आवाहन केले.
असा प्रकार पाहिला नाही : राजनाथसिंह
या गोंधळामुळे पंतप्रधान मोदी यांना आपल्या नव्या मंत्र्याचा परिचय करून देता येत नव्हता. संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनीही विरोधी सदस्यांच्या या वर्तनाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. २४ वर्षांच्या संसदीय जीवनात असा प्रकार मी कधी पाहिला नाही. संसदीय परंपरा पायदळी तुडवल्या जात आहे, असे राजनाथसिंह म्हणाले. संसदेची सर्वांत मोठी ताकद त्यांची स्वस्थ परंपरा असते, या परंपरा जपण्याची जबाबदारी सरकार आणि विरोधी पक्ष अशा दोघांचीही असते. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर नव्या मंत्र्याचा पंतप्रधानांनी संसदेला परिचय करून देण्याची परंपरा आहे, पण त्या परंपरेला विरोधी पक्षांच्या आजच्या वागणुकीने तडा गेला, अशी टीका राजनाथसिंह यांनी केली.
राज्यसभेतही गोंधळ
पंतप्रधान मोदी नव्या मंत्र्यांचा परिचय करून देत असताना राज्यसभेतही गदारोळ झाला. यामुळे सभागृहाचे कामकाज दोनवेळा स्थगित करावे लागले. मोदी मंत्र्यांचा परिचय करून देण्यासाठी उभे होताच विरोधी सदस्यांनी वेलमध्ये धाव घेत घोषणाबाजी केली. सदस्यांनी शांत राहण्याचे आणि आपल्या जागेवर जाण्याचे आवाहन अध्यक्ष व्यंकय्या नायडू करीत होते, पण त्याला प्रतिसाद मिळत नव्हता. सदस्यांच्या या वागणुकीवर मोदी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

Posted by : | on : 20 Jul 2021
Filed under : राष्ट्रीय, संसद
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g