किमान तापमान : 24.59° से.
कमाल तापमान : 25.79° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 48 %
वायू वेग : 5.84 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.59° से.
23.83°से. - 25.97°से.
शुक्रवार, 24 जानेवारी छितरे हुए बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.47°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलऑक्सफर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञांचे संशोधन,
नवी दिल्ली, २६ फेब्रुवारी – जगभरात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले असले तरी वेगवेगळ्या माध्यमातून ही लस कशी देता येईल यावर शास्त्रज्ञ सातत्याने काम करीत आहेत. लसीकरणाने अपेक्षित वेग साध्य केलेला नाही. त्यामुळे आता याचा वेग वाढवण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लस ही गोळ्या आणि स्प्रेच्या स्वरूपात तयार करण्याचे काम ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी हाती घेतले आहे.
कमी वेळात आणि कमीत कमी किमतीत कोरोना विषाणूवर लस शोधून आणि ती जगभरातील ५० पेक्षा अधिक देशात उपलब्ध करून दिल्याबद्दल ऑक्सफर्ड विद्यापीठाचे शास्त्रज्ञ कौतुकास पात्र ठरले आहेत. मात्र, असे असले तरी भारतासारख्या देशात अजूनही लसीकरणाने म्हणावा तसा वेग घेतलेला नाही. आफ्रिकेतील आणि आशियातील अनेक देशात अद्याप लसीकरण सुरू देखील झालेले नाही. लसींची कमी प्रमाणात असणारी उपलब्धता हे याचे मुख्य कारण आहे. तसेच लसीसाठी लागणार्या पायाभूत सुविधा आणि लस ही इंजेक्शन स्वरूपात असल्याने कमी वेळेत जास्त उत्पादन करता येत नाही.
या सर्व प्रश्नांचा विचार करून आणि कमी वेळेत संपूर्ण जगभरात लस उपलब्ध व्हावी म्हणून ऑक्सफर्ड विद्यापीठाचे शास्त्रज्ञ कोरोना प्रतिबंधक लस गोळीच्या आणि स्प्रेच्या स्वरूपात निर्माण करण्याच्या तयारीला लागले आहेत. कोरोना विषाणूचा शरीरात प्रवेश नाकावाटे अथवा तोंडावाटे होतो. शरीरात प्रवेश केल्यावर सर्वात प्रथम श्वसनमार्गाच्या वरच्या भागामध्ये तो संसर्ग करतो आणि काही दिवसांनंतर तो श्वसनमार्गाच्या खालच्या भागामध्ये संसर्ग करतो. जर कमीत कमी वेळेत कोरोना विषाणूला शरीरामधून बाहेर काढायचे असेल किंवा नष्ट करायचे असेल तर श्वसनमार्गाच्या वरच्या भागात रोगप्रतिकारक शक्ती क्रियाशील राहण्याची गरज आहे.
नाक अथवा तोंडात लस पोहोचविण्यामुळे शरीराच्या श्वसनमार्गाच्या वरच्या भागाच्या प्राथमिक पेशींमध्ये प्रतिपिंडे (अँटिबॉडीज) तयार होऊन विषाणू पुढे पसरण्याचा म्हणजेच आपल्या फुफ्फुसांमध्ये जाण्याचा मार्ग रोखला जाऊ शकतो. जेव्हा लस गोळीच्या स्वरूपात दिली जाईल तेव्हा बराच वेळ ती गोळी तोंडात ठेवल्याने श्वसनमार्गाच्या वरच्या भागातील प्राथमिक रोगप्रतिकारक पेशींना लसीचा फायदा होतो.
ऑक्सफर्ड-ऍस्ट्रॅजेनेका लस ज्या शास्त्रज्ञांच्या पुढाकाराने तयार झाली, त्यापैकी एक ऑक्सफर्ड विद्यापीठाचे शास्त्रज्ञ प्रा. सारा गिलबर्ट यांनी इंग्लंडमधील कॉमन्स सायन्स ऍण्ड टेक्नॉलॉजी समितीसमोर, २४ फेब्रु्रुवारी रोजी या विषयावर चर्चा केली. अशा प्रकारे लसीची गोळी तयार करण्याचा हा जगातील पहिलाच प्रयोग असेल आणि त्यामुळेच यासाठी काही काळही लागू शकतो, असे प्रा. गिलबर्ट यांनी सांगितले. अशा प्रकारे वेगळ्या पद्धतीने लस तयार केल्यानंतर त्याची सुरक्षितता आणि नंतर कार्यक्षमतेची चाचणी घ्यावी लागेल.
याचा अजून एक फायदा म्हणजे यामुळे शरीरात तयार होणारी रोगप्रतिकारक प्रतिक्रिया थोडी वेगळी पण आताच्या इंजेक्शनपेक्षा अधिकच असेल. ही लस जर गोळीच्या स्वरूपात उपलब्ध झाली तर कमीत कमी वेळेत संपूर्ण जगात लसीकरण करता येईल.
इंग्लंडचे लस (आरोग्य) मंत्री नदिम जहावी यांनी या प्रयोगाला सर्वतोपरी सहकार्य आणि निधी पुरवण्याचे जाहीर केले आहे. अमेरिकेतील इम्युनिटीबायो या कंपनीने गोळी अथवा टॅब्लेटच्या स्वरूपात लस तयार करण्यासाठी ऑक्सफर्डचे शास्त्रज्ञ विकसित करत असलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करून लसीच्या नैदानिक चाचण्या सुरू केल्या आहेत.