किमान तापमान : 25.97° से.
कमाल तापमान : 27.32° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 41 %
वायू वेग : 9.47 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.32° से.
23.58°से. - 27.99°से.
शुक्रवार, 24 जानेवारी घनघोर बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.47°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलभारताचा चीनला स्पष्ट संदेश,
नवी दिल्ली, २६ फेब्रुवारी –
द्विपक्षीय संबंध कायमचे चांगले ठेवण्यासाठी आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भविष्यात पुन्हा तणाव निर्माण व्हायला नको, यासाठी सीमेवरील सर्वच संवेदनशील ठिकाणांवरून आपापले सैन्य माघारी घेणे आवश्यक आहे, असा स्पष्ट संदेश भारताने चीनला दिला आहे.
मागील आठवड्यातील बैठकीनंतर चीनने आपले सैनिक बहुतांश ठिकाणांहून माघारी बोलावले होते. त्याचवेळी भारतानेही माघारीची प्रक्रिया सुरू केली. मात्र, अजूनही काही भागांमध्ये दोन्ही देशांचे सैनिक तैनात आहेत. ही ठिकाणे देखील रिकामी करण्यात यावी, अशी भूमिका भारताने घेतली आहे.
विशेष म्हणजे, भविष्यात संघर्षासारखी स्थिती उद्भवण्याचे चिन्ह दिसले, तर लगेच परपस्परांशी संपर्क साधण्यासाठी नव्या प्रकारची हॉटलाईन यंत्रणाही आता प्रस्थापित करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मागील आठवड्यात परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आणि चीनमधील समपदस्थ वॉंग यी यांच्यात दूरध्वनीवरून ७५ मिनिटे चर्चा झाली होती. या चर्चेचा सविस्तर तपशील आज शुक्रवारी मंत्रालयाने एका निवेदनातून जाहीर केला. मागील वर्षभराच्या काळात दोन्ही देशांमधील संबंधात अभूतपूर्व तणाव निर्माण झाला आहे. सीमावादावर तोडगा निघण्यास बराच कालावधी लागू शकतो. मात्र, त्यामुळे सीमेवरील शांतता विस्कळीत व्हायला नको. दोन्ही देशांनी याची काळजी घ्यायला हवी. यासाठी हिंसाचार होणे, सैनिकांनी एकमेकांवर धावून जाणे, हा प्रकार देखील योग्य नाही, असे जयशंकर यांनी स्पष्ट केले.
चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनीही त्यांची ही भूमिका मान्य केली. भविष्यात अशी कोणतीही स्थिती निर्माण झाल्यास, आपण लगेच हॉटलाईनवर एकमेकांशी संपर्क साधू, असे वॉंग यी यांनी सांगितले. आपण एकमेकांवर विश्वास ठेवायलाच हवा. कुठल्याही स्थितीत या विश्वासाला तडा जायला नको. द्विपक्षीय सहकार्य कायम राहील, यावर आपण आता भर देऊ, असेही ते म्हणाले.