किमान तापमान : 25.5° से.
कमाल तापमान : 27.83° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 47 %
वायू वेग : 9.86 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.83° से.
23.58°से. - 28.99°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.33°से. - 27.04°से.
शनिवार, 25 जानेवारी टूटे हुए बादल25.05°से. - 27.61°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.42°से. - 28.19°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.65°से. - 27.75°से.
मंगळवार, 28 जानेवारी कुछ बादल25.13°से. - 26.87°से.
बुधवार, 29 जानेवारी घनघोर बादलमोदी सरकारचा राज्यांना सतर्कतेचा इशारा,
नवी दिल्ली, १४ जुलै – कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना अनेक राज्यांमध्ये निर्बंध शिथिल होत आहेत. याचा अनेक नागरिक गैरफायदा घेत असल्याचे चित्र असून, कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. यापुढे ज्या भागांत कोरोना नियमांचे उल्लंघन होईल आणि धोका वाढेल, अशा सर्व ठिकाणी कडक निर्बंध लादण्यात यावे, असा स्पष्ट इशारा केंद्र सरकारने आज बुधवारी सर्व राज्यांना दिला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज याबाबतचे पत्र सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पाठविले आहे. देशभरात मान्सून दाखल झाल्यानंतर अनेक जण पर्यटनासाठी बाहेर पडत आहेत. अनेक पर्यटनस्थळांवर प्रचंड गर्दी होत असून, मुखाच्छादन न घालता आणि भौतिक दूरतेचे पालन न करता पर्यटक गर्दी करीत आहेत. काही राज्यांमध्ये बाजारपेठा, दुकाने आणि मॉल्समध्ये ग्राहकांची झुंबड उडत असल्याचे चित्र दिसत असून, या गोष्टी कोरोनाच्या तिसर्या लाटेला आमंत्रण देणार्या ठरू शकतात, असा इशारा आरोग्य मंत्रालयाने पत्रातून दिला आहे.
ईशान्येकडील राज्यांमध्ये पुन्हा कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. या राज्यांची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून असल्यामुळे आणि आता पर्यटनासाठी राज्यांच्या सीमा खुल्या झाल्याने पर्यटकांची गर्दी वाढली आहे, याकडे पत्रातून लक्ष वेधण्यात आले. राज्यांना व्यवहार पूर्ववत सुरू करण्याची परवानगी देण्यात आली असली, तरी कोरोनाबाबत ठरविलेल्या निकषांचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घेणे तितकेच बंधनकारक असल्याची आठवण पत्रातून करून देण्यात आली आहे. कोरोना नियमांचे पालन झाले नाही, तर पुन्हा त्या भागांत निर्बंध लागू केले जावे, अशी सूचना पत्रातून करण्यात आली आहे.
गर्दीच्या ठिकाणी लक्ष द्या
बाजारपेठा, मॉल्स, पर्यटन ठिकाणे, थिएटर्स, रेस्टॉरंट्स, बाजारपेठा, लग्नसोहळे, रेल्वे स्थानक, बस स्थानक, जिम, बगिचे आणि मैदाने या सर्व ठिकाणांवर स्थानिक प्रशासनाने लक्ष ठेवावे. कुठेही गर्दी होताना दिसली, तर तिथे निर्बंध जारी केले जावे, अशी सूचनाही पत्रातून करण्यात आली आहे.