किमान तापमान : 28.99° से.
कमाल तापमान : 29.09° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 65 %
वायू वेग : 5.63 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.99° से.
27.3°से. - 30.22°से.
रविवार, 17 नोव्हेंबर हल्की वर्षा27.95°से. - 31.2°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल26.92°से. - 31.17°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.02°से. - 30.17°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.59°से. - 30.1°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.4°से. - 29.75°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादलपंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा,
नवी दिल्ली, ५ जुलै – कोरोना लसीकरणासाठी स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित करण्यात आलेले कोविन ऍप हे संपूर्ण जगाला उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोमवारी केली. कोरोनाविरोधी लढ्यात भारत आपले तंत्रज्ञान आणि अन्य स्रोत जगातील प्रत्येक देशाला देण्यासाठी वचनबद्ध असल्याचे प्रतिपादनही पंतप्रधानांनी केले.
कोविनवरील जागतिक परिषदेला आभासी पद्धतीने मार्गदर्शन करताना पंतप्रधान म्हणाले की, कोरोना काळात आम्हाला जो अनुभव आला, त्यावरून एक गोष्ट लक्षात आली की, कोणताही देश मग तो कितीही सामर्थ्यशाली असो, स्वबळावर अशा प्रकारच्या संकटावर मात करू शकत नाही.
कोरोना संकटाच्या पहिल्या दिवसापासूनच भारत आपला अनुभव, तंत्रज्ञान आणि इतर वैद्यकीय सामग्री जगाला देत आला आहे. भारताची लोकसंख्या फार मोठी आहे. देशात कोरोनाचे भीषण संकट असतानाही आम्ही आपले कर्तव्य पार पाडले, असे मोदी यांनी सांगितले. भारताने कोरोनाविरोधी लढा मजबूत करण्यासाठी जे कोविन ऍप विकसित केले, त्यात पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. कोरोनाबाधितांचा आणि त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी हे ऍप अतिशय उपयुक्त ठरले आहे, असे मोदी म्हणाले.
५० देशांनी दाखवली रुची
कोविन ऍप प्राप्त करण्यासाठी या परिषदेत सुमारे ५० देशांनी रुची दाखवली आहे. यात कॅनडा, मेक्सिको, नायजेरिया, पनामा, युगांडा यासारख्या देशांचा समावेश आहे.